नफावसुलीने सेन्सेक्स ४१३ अंश घसरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नफावसुलीने सेन्सेक्स ४१३ अंश घसरला
नफावसुलीने सेन्सेक्स ४१३ अंश घसरला

नफावसुलीने सेन्सेक्स ४१३ अंश घसरला

sakal_logo
By

मुंबई, ता. १६ ः जागतिक शेअरबाजारांमध्ये आज अनुकूल वातावरण असले, तरीही भारतीय शेअरमध्ये वरच्या भावांमध्ये नफावसुली झाल्याने भारतीय शेअरबाजार निर्देशांक अर्ध्या टक्क्याहून जास्त घसरले. सेन्सेक्स ४१३.२४ अंश; तर निफ्टी ११२.३५ अंश कोलमडला.
गेल्या दोन दिवसांची निर्देशांकांमधील तेजी आज संपुष्टात आली. आज जागतिक शेअरबाजार अनुकूल असले, तरी सेन्सेक्स व निफ्टीची सुरुवात संथ झाली. सेन्सेक्स दिवसभर ६२ हजारांच्या वर असला, तरी तो तेथे टिकू शकला नाही. दुपारी विक्रीला सुरुवात झाल्याने दिवसअखेर सेन्सेक्स ६१,९३२.४७ अंशांवर; तर निफ्टी १८,२८६.५० अंशांवर स्थिरावला. आज वाहननिर्मिती, आरोग्य, बँका व धातूनिर्मिती ही क्षेत्रे तोट्यात होती. यातील वाहननिर्मिती शेअर निर्देशांक एक टक्का घसरला; तर आरोग्य, बँका व धातूनिर्मिती क्षेत्रांचे शेअर निर्देशांक अर्धा टक्का घसरले. आज निफ्टीच्या प्रमुख ५० पैकी ३३ शेअरचे भाव कमी झाले. सेन्सेक्समधील एचडीएफसी, टाटा मोटर, महिंद्र आणि महिंद्र, एचडीएफसी बँक या शेअरचे भाव दोन टक्का घसरले; तर कोटक बँक, मारुती, रिलायन्स इंडस्ट्रीज, एअरटेल, सनफार्मा, एचसीएल टेक, आयटीसी या शेअरचे भाव एक टक्का घसरले. दुसरीकडे बजाज फायनान्स, स्टेट बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, टायटन या शेअरचे भाव अर्धा ते एक टक्का घसरले.
...
परदेशी वित्तसंस्थांची सतत खरेदी सुरू आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेची आकडेवारीही चांगली आहे; मात्र जागतिक व्याजदर तसेच अन्य अनिश्चिततेमुळे भारतात वरच्या भावावर नफावसुली होतच राहणार आहे.
- श्रीकांत चौहान, कोटक सिक्युरिटीज.