मुंबईत रंगणार ‘महेफिल-ए-गझल’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत रंगणार ‘महेफिल-ए-गझल’
मुंबईत रंगणार ‘महेफिल-ए-गझल’

मुंबईत रंगणार ‘महेफिल-ए-गझल’

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : सामाजिक बांधिलकी जपतानाच समाजोपयोगी शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवण्यासाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने महापालिका अभियंता, अधिकारी आणि कर्मचारी यांचा उपक्रम असलेल्या ऋणानुबंध अभियानाच्या वतीने रविवारी (ता. २८) सायंकाळी सहा वाजता श्री. षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह येथे ‘महेफिल-ए-गझल’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गझलनवाज भीमराव पांचाळे आणि डॉ. कुणाल इंगळे या मैफलीत गझल सादर करतील.
ऋणानुबंध अभियान हा महापालिकेतील अभियंता, अधिकारी आणि कर्मचारी यांचा उपक्रम आहे. या अभियानांतर्गत विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करणे, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे, वाचनालय तसेच ग्रंथालय चालवणे, विविध महापुरुषांच्या जयंती साजरी करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, समाज मंदिर, समाज केंद्र, विपश्यना केंद्राची उभारणी करणे, समाजाच्या सांस्कृतिक विकासासाठी कलापथके, नाट्यसंस्था इत्यादी मार्गाने लोककलांचा विकास साधणे आदी उपक्रम राबवले जातात. हीच सामाजिक बांधिलकी जपताना विविध उपक्रम राबवण्यासाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने ‘महेफिल-ए-गजल’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अत्यंत भावोत्कट शब्दरचना आणि तितकेच बहारदार सादरीकरण करणारे गझलनवाज भीमराव पांचाळे आणि संगीतज्ज्ञ डॉ. कुणाल इंगळे या कार्यक्रमात श्रोत्यांसमोर गझल सादर करतील. या मैफलीच्या प्रवेशिका आरक्षित करण्यासाठी सचिन मगरे (९९३०९५४६०१), तुषार निकाळजे (९७०२०५३३४४), प्रशांत जगताप (९८६९३८६७१२), प्रवीण कटारे (९९३०५०२३२२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.