पेटीएम व एसबीआय कार्डचे रुपे क्रेडिट कार्ड बाजारात

पेटीएम व एसबीआय कार्डचे रुपे क्रेडिट कार्ड बाजारात

मुंबई, ता. १८ ः पेटीएमची मुख्य कंपनी असलेल्या वन नाईंटी सेवन कम्युनिकेशनतर्फे आज एसबीआय कार्डच्या सहयोगाने रुपे नेटवर्कचे क्रेडिट कार्ड बाजारात आणल्याची घोषणा करण्यात आली.
या वेळी पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा, पेटीएमचे समूह अध्यक्ष मधुर देवरा, पेटीएमचे सीओओ भावेश गुप्ता, एसबीआय कार्डचे रमा मोहन राव आदी हजर होते. पेटीएम व एसबीआय कार्ड यांची भागीदारी तीन वर्षे जुनी असून आता ती नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनच्या रुपे यंत्रणेवरही सुरू होईल. या कार्डधारकांना भरपूर फायदे मिळणार असून त्यात फर्स्ट मेंबरशिपची सवलत, ओटीटी प्लॅटफॉर्म मेंबरशिप, पेटीएम ॲप वरून बुकिंग केल्यास विमानांच्या तिकिटांवर सवलत, पेटीएमवरून खरेदी केल्यास सवलत, पेटीएम एसबीआय कार्डवरून चित्रपट तिकिटे आणि प्रवास तिकिटांवर तीन टक्के कॅशबॅक तर पेटीएमवरून अन्य खरेदी केल्यास दोन टक्के कॅशबॅक अशा सवलती मिळतील. त्याचप्रमाणे एक टक्के इंधन अधिभारापासून मुक्ती आणि एक लाख रुपयांचे सायबर फ्रॉड इन्शुरन्स कव्हरेजही प्लॅटिनम कार्डधारकांना मिळेल. अर्ज केल्यानंतर हे कार्ड त्वरेने मिळेल त्याला फार वेळ लागणार नाही, अशी माहिती विजय शेखर शर्मा यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com