आरे कॉलनीमध्ये पालिका संरक्षण भिंत उभारणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरे कॉलनीमध्ये पालिका संरक्षण भिंत उभारणार
आरे कॉलनीमध्ये पालिका संरक्षण भिंत उभारणार

आरे कॉलनीमध्ये पालिका संरक्षण भिंत उभारणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १८ : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील हिंस्र प्राण्यांपासून आरे कॉलनीतील रहिवाशांचे संरक्षण करण्यासाठी संरक्षण भिंत उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. आरे कॉलनीतील बिबट्यांच्या हल्ल्यात आरे कॉलनीतील अनेक रहिवासी जखमी झाले; तर काहींना आपला जीवदेखील गमवावा लागला. यामुळे उद्यान आणि आरे कॉलनीदरम्यान संरक्षण भिंत उभारण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार उद्यान आणि आरे कॉलनीदरम्यान संरक्षण भिंत उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. एकूण १.९ किलोमीटरची संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. यावर एकूण ३.३३ कोटींचा खर्च केला जाणार आहे. सध्या निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. पावसाळ्यपूर्वी ही भिंत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.