दादरमध्ये नवीन पादचारी पूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दादरमध्ये नवीन पादचारी पूल
दादरमध्ये नवीन पादचारी पूल

दादरमध्ये नवीन पादचारी पूल

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ : जी उत्तर विभागातील दादर-माहीम परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून या भागात पादचारी पूल उभारण्याचा निर्णय पालिकेच्या पूल विभागाने घेतला आहे. मृदुंगाचार्य ग्राऊंड येथील जनरल अरूणकुमार वैद्य मार्गाच्या पलिकडे हा पूल बांधण्यात येणार आहे. यासाठी सुमारे ४ कोटी ९४ लाख ११ हजार ८५७ कोटी रुपये खर्च केला जाणार आहेत. स्टेनलेस स्टील आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या पादचारी पुलाचे काम केले जाणार आहे. सध्या या कामासाठी ई-निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढील १५ दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करून पावसाळा वगळून पुढील १८ महिन्यांत काम पूर्ण करायचे आहे.