बेस्टच्या ताफ्यात लवकरच २१०० ई-बस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेस्टच्या ताफ्यात लवकरच २१०० ई-बस
बेस्टच्या ताफ्यात लवकरच २१०० ई-बस

बेस्टच्या ताफ्यात लवकरच २१०० ई-बस

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ : गेल्या वर्षी बेस्ट प्रशासनाने केलेला २१०० सिंगल डेकर बसचा करार टाटा मोटर्सने घेतलेल्या आक्षेपामुळे रखडला होता. आता सर्वोच्च न्यायालयाकडून बेस्ट प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य ठरवल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
या निर्णयामुळे लवकरच अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या ऑलेक्ट्रा आणि इव्हे ट्रान्सच्या ई बस आता बेस्टच्या ताफ्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाची पुन्हा निविदा मागवण्याची सूचना बाजूला ठेवत बेस्ट प्रशासनाचा १४०० बससाठीच्या कंत्राटदाराची निवड योग्य ठरवली. यानुसार इव्हे ट्रान्सचा १४०० सिंगल डेकर बसचा करार योग्य ठरला आहे. या बरोबरीने अजून ७०० सिंगल डेकर बसची मागणीदेखील त्या वेळेस बेस्टने इव्हे ट्रान्सला दिली होती. त्यामुळे एकूण २१०० वातानुकूलित, अत्याधुनिक ई बस आता बेस्टच्या ताफ्यात लवकरच दाखल होतील. जुन्या डिझेल बस या पर्यावरणीय नियमावलीनुसार बाद होत असल्याने बेस्ट ताफ्यात बसचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे प्रवाशांचा बसदरम्यानचा प्रतीक्षा कालावधीसुद्धा वाढला होता. नवीन बस येणार असल्याने प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.