संशोधनासाठी कोकणातील १० प्राध्यापकांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संशोधनासाठी कोकणातील १० प्राध्यापकांची निवड
संशोधनासाठी कोकणातील १० प्राध्यापकांची निवड

संशोधनासाठी कोकणातील १० प्राध्यापकांची निवड

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ : मुंबई विद्यापीठ आणि राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र शासन यांच्यात झालेल्या सामंजस्य करारान्वये १० प्राध्यापकांच्या संशोधन प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून त्यांना संशोधन प्रकल्पासाठी निधीचे वाटप करण्यात आले.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साह्याने लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी व समाजाभिमुख नावीन्यपूर्ण संशोधन करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला होता. या करारान्वये मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकांकडून या प्रकल्पाअंतर्गत विद्यार्थी विकास विभागामार्फत संशोधनासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यातून तज्ज्ञ समितीमार्फत छाननी केलेल्या २२ संशोधन प्रकल्पांचे प्रकल्प मूल्यांकन समितीपुढे सादरीकरण केल्यानंतर १० संशोधन प्रकल्पांची निवड करण्यात आली. या संशोधन प्रकल्पांना ४३ लाख ७४ हजार रुपयाचे अर्थसाह्य करण्यात आले. राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या या प्रकल्पाअंतर्गत रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यातील स्थानिक गरजा, शेती, पर्यटन, पर्यावरण, आपातकालिन परिस्थिती, नैसर्गिक साधन संपत्ती, वातावरण बदलामुळे शेतीवर होणारे परिणाम, आव्हाने, पाणी समस्या, मत्स्यउत्पादन, फलोत्पादन प्रक्रिया आणि त्यासाठी लागणारी विपणन व्यवस्था अशा अनुषंगिक विषयांवर संशोधन करण्यासाठी आयोगामार्फत अर्थसाह्य केले जाते.
...
यांची झाली निवड
समितीमार्फत निवड करण्यात आलेल्या संशोधन प्रकल्पांमध्ये ललिता नेमाडे (गोविंदराव निकम फार्मसी महाविद्यालय सावर्डे), डॉ. सपना जाधव (सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर), डॉ. भारत ढोकचावळे (सेंट जॉन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च पालघर), डॉ. महेश मुदगल (कला- वाणिज्य- विज्ञान महाविद्यालय जव्हार), डॉ. अरुण चांदोरे (कला- वाणिज्य- विज्ञान महाविद्यालय मोखाडा), अनघा पाटील (विद्यावर्धिनी अभियांत्रिकी महाविद्यालय वसई), डॉ. मीनल पाटील (एन.बी. मेहता विज्ञान महाविद्यालय, बोर्डी) आणि डॉ. दिलीप यादव (सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर) यांच्या संशोधन प्रकल्पांचा समावेश आहे.
...