शाळा सुरू होण्यापूर्वी पाठ्यपुस्तके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा सुरू होण्यापूर्वी पाठ्यपुस्तके
शाळा सुरू होण्यापूर्वी पाठ्यपुस्तके

शाळा सुरू होण्यापूर्वी पाठ्यपुस्तके

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ : राज्यातील सरकारी, ‍स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शैक्षणिक सत्राची सुरुवात होण्यापूर्वी दहा दिवस अगोदर पाठ्यपुस्तके पोहोचवली जाणार आहेत. यासाठी समग्र शिक्षा अभियानामार्फत नियोजन करण्यात आले असून अनेक जिल्ह्यामध्ये या पुस्तकाच्या पुरवठ्याला सुरुवातही झाली असल्याची माहिती समग्र शिक्षा अभियानाचे प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी दिली.
यंदा दुसरी ते आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तके ही एकात्म‍िक व द्व‍िभाषिक पद्धतीची नव्याने तयार करण्यात आली असून त्याला वह्यांची पाने जोडण्यात आली आहेत. त्यामुळे याच्या किमतीही वाढल्या असल्या तरी राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिकत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना ती मोफत उपलब्ध करून दिली जातात. त्यात पुरवण्यात येणारी पुस्तके ही मराठीसह दहा विविध माध्यमांतील आहेत.
यंदा राज्यातल्या सरकारी शाळांतील १ कोटी ७ लाख ४७ हजार ७२८ विद्यार्थ्यांना तब्बल ४ कोटी ३७ लाख २१ हजार ९५१ पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यासाठी मागील काही दिवसांपासून ही पुस्तके प्रत्येक शाळांपर्यंत पोहोचवण्यासाठीची कार्यवाही सुरू झाली असून ५ जूनपर्यंत राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये ही पाठ्यपुस्तके पोहोचतील, अशी माहितीही प्रकल्प संचालक पगारे यांनी दिली.
...
पुण्यात सर्वाधिक विद्यार्थी
राज्यात १५ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार असून त्यापूर्वीच शाळांमध्ये ही नवीन पाठ्यपुस्तके पोहोचवण्यासाठी आमची सर्व यंत्रणा कामी लागली आहे. शाळेचे पहिले पाऊल पडण्यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या हातात त्यांची त्या-त्या वर्गातील पाठ्यपुस्तके असतील, असेही पगारे यांनी सांगितले.
यंदाच्या सत्रात सर्वाधिक पुस्तकांचे वितरण पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना केले जाणार असून सर्वांत कमी संख्या ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. मुंबईत मुंबई बीएमसीमध्ये ३ लाख ५७ हजार ९५९ तर मुंबई डीवायडीमध्ये २ लाख ५५ हजार ६१७ विद्यार्थ्यांना ही पुस्तके वितरित केली जाणार आहेत.