Wed, October 4, 2023

बॉम्बे सुपर हायब्रीड सीड्सला २२७ कोटींचा महसूल
बॉम्बे सुपर हायब्रीड सीड्सला २२७ कोटींचा महसूल
Published on : 22 May 2023, 3:09 am
राजकोट, ता. २२ : कृषी क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘बॉम्बे सुपर हायब्रीड सीड्स लि.’ने मार्च २०२३ ला संपलेल्या आर्थिक वर्षात २२७.९२ कोटी रुपये महसूल; तर १६.८४ कोटी रुपये निव्वळ नफा मिळवला आहे. कंपनीकडे बियाण्यावर प्रक्रिया करणारे केंद्र, मोठे शीतगृह आदी सोयीसुविधा आहेत. मागील आर्थिक वर्षात त्यांचा महसूल १९१.७२ कोटी रुपये तर नफा १०.५५ कोटी रुपये होता. यावर्षीचा नफा मागील वर्षीपेक्षा ५९ टक्के तर महसूल १९ टक्के वाढला. कंपनीचा राखीव निधीदेखील वाढून ४५.८४ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे, असे व्यवस्थापकीय संचालक पिंटूभाई पटेल म्हणाले.