विद्यापीठाने मान्यताप्राप्त शिक्षकांची नावे वगळली

विद्यापीठाने मान्यताप्राप्त शिक्षकांची नावे वगळली

मुंबई, ता. २३ : मुंबई विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये मान्यताप्राप्त असलेल्या शेकडो शिक्षकांना सिनेट निवडणुकीच्या मतदार यादीतून विद्यापीठ प्रशासनाने वगळण्याचा प्रकार केला असल्‍याचा आरोप, मुंबई युनिर्व्हसिटी अॅण्ड कॉलेज टीचर्स असोसिएशन (मुक्ता) संघटनेने केला आहे. तसेच याबाबत जबाबदार असलेल्या प्रभारी कुलसचिवांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी देखील त्‍यांनी केली आहे.
मुंबई विद्यापीठाने सिनेट निवडणूक २०२२ साठी मतदार यादी ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर जाहीर केली आहे. यामध्ये एकूण ३ हजार८७ शिक्षकांची नावे आहेत. मात्र यातून विद्यापीठात मान्यताप्राप्त असलेल्या तब्बल ५९७ शिक्षकांची नावे वगळण्यात आली आहेत. यामुळे शिक्षकांमध्ये या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

काय आहे आरोप?
सिनेट मतदार नोंदणीची सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली. त्यात असंख्य प्रकारच्या त्रुटी होत्या. त्यात प्रशासनाने सुधारणा करण्याऐवजी मतदार म्हणून नोंदणी करताना काही शिक्षकांनी पद मान्यतेसंदर्भात कागदपत्रे जोडली नसल्याचे कारण सांगत त्यांना मतदार यादीतूनच बाद केले आहे. तर शिक्षकांनी सर्व कागदपत्रे जोडूनही शिक्षकांना जाणूनबुजून मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप मुक्ता संघटनेने केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com