Tue, Sept 26, 2023

पाच हजार विद्यार्थ्यांना रिलायन्स फाऊंडेशनची शिष्यवृत्ती
पाच हजार विद्यार्थ्यांना रिलायन्स फाऊंडेशनची शिष्यवृत्ती
Published on : 23 May 2023, 1:44 am
मुंबई, ता. २३ ः रिलायन्स फाऊंडेशनच्या सन २०२२-२३ च्या शिष्यवृत्ती योजनेत पाच हजार पात्र विद्यार्थ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. हे विद्यार्थी पदवी वर्षाच्या पहिल्या वर्षाला शिकत आहेत.
हे विद्यार्थी अभियांत्रिकी, कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, आर्किटेक्चर, व्यवस्थापन आदी सर्व शाखांमधील असून त्यातील निम्म्या मुली आहेत.
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या ४,९८४ शिक्षण संस्थांमधील चाळीस हजार विद्यार्थ्यांमधून कठोर चाचणीद्वारे ही निवड करण्यात आली आहे. यात ९९ दिव्यांग विद्यार्थीही आहेत, असे रिलायन्स फाऊंडेशनचे सीईओ जगन्नाथ कुमार यांनी सांगितले. येत्या दहा वर्षांत रिलायन्स फाऊंडेशन पन्नास हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार असून १९९६ पासून त्यांनी तेरा हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे.