मतदार यादीतील घोळ राज्यपालांच्या दारी

मतदार यादीतील घोळ राज्यपालांच्या दारी

मुंबई, ता. २३ : मुंबई विद्यापीठात मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले शिक्षक आणि विभागप्रमुख यांना सिनेट मतदारयादीमधून वगळण्यात आल्याने याविषयी संघटना संतापल्या आहेत. त्यामुळे आता थेट कुलपती तथा राज्यपालांची भेट घेणार आहेत. मुंबई विद्यापीठाच्या या भोंगळ कारभाराची राज्यपालांनी दखल घ्यावी, अशी मागणी ते करणार असल्याची माहिती बाबासाहेब डॉ. आंबेडकर टीचर्स असोसिएशन (बिदाता)चे अध्यक्ष डॉ. अविनाश शेंद्रे यांनी दिली.
विद्यापीठ प्रशासनाकडून सिनेट मतदार यादीत सुरुवातीला जवळपास १ हजार ३७८ शिक्षक आणि १ हजारपेक्षा जास्त विभाग प्रमुखांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली होती. त्यानंतर आपल्या कार्यालयाकडून ६ मार्चपर्यंत त्यात त्रुटींची पूर्तता करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले गेले. त्यानंतर जवळपास एक हजारपेक्षा जास्त शिक्षकांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली. त्याचबरोबर ५०० पेक्षा जास्त विभागप्रमुखांची नावे अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत; परंतु अजूनही असंख्य शिक्षक आणि विभागप्रमुखांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली असून त्यासाठी मान्यता आदी कारणे दाखवण्यात आली आहेत. मात्र ही बाब आक्षेपार्ह असून जे शिक्षक, विभागप्रमुख विद्यापीठात कार्यरत आहेत, त्यांची मान्यता असताना ती नाही म्हणून मतदारयादीत वगळणे चुकीचे आणि मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रकार असल्याचे डॉ. शेंद्रे यांनी सांगितले.
...
अशा आहेत त्रुटी
एकाच महाविद्यालयातील दोन शिक्षकांची नावे विभागप्रमुख म्हणून अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्याचबरोबर एका महाविद्यालयातील विभागप्रमुखाचे नाव डावलून त्याऐवजी दुसऱ्याच शिक्षकाचे नाव विभागप्रमुख म्हणून अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच परीक्षा कामातून कायमस्वरूपी अपात्र ठरवलेल्या शिक्षकाचे नाव विभाग प्रमुख मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
...
२० वर्षापासून कार्यरत शिक्षक
ज्या शिक्षकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत, ते शिक्षक मागील २० ते २५ वर्षांपासून विविध महाविद्यालयात आणि विद्यापीठात कार्यरत आहेत व ते आपले योगदान महाविद्यालयीन व विद्यापीठीय कामकाजात सातत्याने देत आहेत. ही अन्यायकारक बाब असून याची विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा संघटनेच्या वतीने अन्नत्याग आंदोलन करावे लागेल. याची सर्वस्वी जबाबदारी आपली असेल, असा इशारा देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com