‘बेस्ट’ करणार अतिरिक्त वीज खरेदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘बेस्ट’ करणार अतिरिक्त वीज  खरेदी
‘बेस्ट’ करणार अतिरिक्त वीज खरेदी

‘बेस्ट’ करणार अतिरिक्त वीज खरेदी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ : मुंबईतील विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या विजेच्या मागणीमुळे ‘बेस्ट’ प्रशासनाने आणखी ५०० मेगावॅट वीज खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बेस्टने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

‘बेस्ट’चे मुंबईत १० लाख ४७ हजार ग्राहक आहेत. दरवर्षी यात वाढ होत असते. शिवाय उन्हाळ्यामध्येही विजेची मागणी वाढते. या मागणीची पूर्तता करण्यासाठी बेस्टने अतिरिक्त ५०० मेगावॉट वीज खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या टाटाकडून बेस्टला ७८० मेगावॉट विजेचा पुरवठा केला जातो. हा पुरवठा वाढवण्यासाठी बेस्टने इतर पर्याय चाचपण्यास सुरुवात केली आहे. विजेसाठी बेस्टने निविदा प्रक्रिया सुरू केली असून पात्र कंपनीकडून पुढील २५ वर्षांसाठी करार करण्यात येणार आहे.

मुंबई शहराची वार्षिक कमाल वीज मागणी ४८२८ दशलक्ष युनिट असून सरासरी रोजची १३.२३ दशलक्ष युनिट इतकी आहे. या विजेच्या मागणीच्या पूर्ततेसाठी प्रामुख्याने टाटा पॉवर कंपनीकडून सरासरी रोजची ८.३१ दशलक्ष युनिट आणि उर्वरित सरासरी रोजची ४.९२ दशलक्ष युनिट विजेच्या मागणीची पूर्तता मनीकरण पॉवर लिमि., पॉवर एक्सचेंज, पर्यावरणपूरक नवीकरणक्षम द्विपक्षीय स्रोत इत्यादी ऊर्जास्रोतांतून वीज खरेदी करण्यात येते, अशी माहिती बेस्टचे जनसंपर्क अधिकारी सुनील वैद्य यांनी दिली.