Tue, October 3, 2023

बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या नोंदणीला सोमवारपासून सुरुवात
बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या नोंदणीला सोमवारपासून सुरुवात
Published on : 25 May 2023, 12:35 pm
मुंबई, ता. २५ : बारावीच्या मुख्य परीक्षेचा निकाल आज जाहीर झाल्यानंतर मंडळाने नापास झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी मिळावी यासाठी जुलै-ऑगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षेचे नियोजन जाहीर केले आहे. या परीक्षेसाठी सोमवारी, २९ मे ते ९ जून या कालावधीत पुनर्परीक्षार्थींना ऑनलाईन अर्ज भरता येतील; तर विलंब शुल्कासह १० ते १४ जून या कालावधीत अर्ज भरता येईल. आज जाहीर झालेल्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्टच्या दरम्यान होणाऱ्या पुरवणी परीक्षेत, तसेच फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या मुख्य परीक्षेत अशा दोनच संधी उपलब्ध होतील. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिलेल्या मुदतीतच अर्ज करण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.