प्रभादेवी-दादर भागात पाणी नाही : शनिवार-रविवारी जलवाहिनी दुरूस्तीचे काम,

प्रभादेवी-दादर भागात पाणी नाही : शनिवार-रविवारी जलवाहिनी दुरूस्तीचे काम,

माहीम, दादर आणि प्रभादेवी
२६ तास पाणी नाही
शनिवार-रविवारी जलवाहिनीची दुरुस्ती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः दादर पश्चिम परिसरात १४५० मिमी व्यासाच्या तानसा जलवाहिनीला लागलेल्या गळतीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी (ता. २७) सकाळी ८ ते रविवारी (ता. २८) सकाळी १० वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. परिणामी २६ तासांच्या कालावधीत जी दक्षिण आणि जी उत्तर विभागातील अर्थात प्रभादेवी व दादर परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.
दादर पश्चिमेतील सेनापती बापट मार्ग व काकासाहेब गाडगीळ मार्ग यांच्या जंक्शनवर असलेल्या तानसा पूर्व व पश्चिम मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे. जलअभियंता विभागातर्फे तिची दुरुस्ती करण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी ८ वाजता दुरुस्ती काम सुरू होईल. रविवारी सकाळी १० वाजता ते पूर्ण होईल. अंतर्गत गळती शोधण्यासाठी संपूर्ण जलवाहिनीचा पुरवठा बंद करावा लागणार आहे. परिणामी रहिवाशांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. सध्या गळती शोधण्यासाठीचे प्राथमिक काम सुरू करण्यात आल्याची माहिती जलअभियंता विभागाने दिली.

पाणीपुरवठा बंद असलेले विभाग
जी उत्तर विभाग
संपूर्ण माहीम पश्चिम, माटुंगा पश्चिम, दादर पश्चिम, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले रोड, काकासाहेब गाडगीळ मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, मोरी मार्ग, सेना भवन परिसर, टी. एच. कटारिया मार्ग, कापड बाजार इत्यादी परिसरात २७ मे रोजी सायंकाळी ४ ते रात्री १० दरम्यान पाणीपुरवठा होणार नाही.

जी दक्षिण विभाग
डिलाईल रोड बीडीडी, संपूर्ण प्रभादेवी परिसर, जनता वसाहत, संपूर्ण लोअर परळ विभाग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, गणपतराव कदम मार्ग, ना. म. जोशी मार्ग, वीर सावरकर मार्ग, एस. एस. अमृतवार इत्यादी परिसरात २७ मे रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ७ दरम्यान पाणीपुरवठा होणार नाही. ना. म. जोशी मार्ग, डिलाईल रोड बीडीडी, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, धोबी घाट, सात रस्ता इत्यादी परिसरात २८ मे रोजी पहाटे ४ ते सकाळी ८ दरम्यान पाणी येणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com