
नवीन संकल्पनांनी गणेशोत्सव साजरा करावा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : यंदा साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव हा नवीन संकल्पना अमलात आणून साजरा करावयाचा आहे. लोकमान्य टिळक यांनी जो हेतू समोर ठेवून गणेशोत्सव सुरू केला, त्या हेतूची जनजागृती करणारा गणेशोत्सव असावा, असे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले. सह्याद्री अतिथीगृहातील सभागृहात मुंबई गणेशोत्सव पूर्व तयारीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीला संबोधित करताना मंत्री मुनगंटीवार बोलत होते.
बैठकीला आमदार आशीष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, उपसचिव विद्या वाघमारे, मुंबई महापालिकेचे उपयुक्त रमाकांत बिरादार, मुंबई शहर अप्पर जिल्हाधिकारी रवी कट्टकधोंड, आदी उपस्थित होते. मंत्री मुनगंटीवार पुढे म्हणाले, क, सांस्कृतिक कार्य विभागाकडून या वर्षीही गणेशोत्सवात स्पर्धा घेण्यात येतील. या वर्षी साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी बैठक घेतलेली आहे. या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार चार फुटांच्या आतील गणपती मूर्ती मातीच्या व चार फुटांवरील मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा मातीच्या बनविण्यात याव्यात. त्याबाबत न्यायालयाने दिलेले निर्देश पाळावेत.