Mon, Sept 25, 2023

लिंकन फार्माला ५३३ कोटींचा महसूल
लिंकन फार्माला ५३३ कोटींचा महसूल
Published on : 26 May 2023, 2:34 am
अहमदाबाद, ता. २६ ः लिंकन फार्मास्युटिकल्स या आरोग्यसेवा कंपनीने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात ५३३ कोटी रुपयांचा महसूल मिळवला असून आर्थिक वर्षात प्रथमच करपूर्व १०० कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. कंपनीने या आर्थिक वर्षासाठी १५ टक्के लाभांशाचीही शिफारस केली आहे.
कंपनीचा करोत्तर नफा ७२.९० कोटी रुपये झाला असून तो गेल्या वर्षी ६९.३६ कोटी रुपये एवढा होता. कंपनीचे एकूण उत्पन्नही मागील वर्षीपेक्षा साडेदहा टक्के जास्त आहे, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक महेंद्र पटेल यांनी दिली. सन २०२६ पर्यंत ७५० कोटी रुपयांचा महसूल गाठण्याचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.