
पराग पारीख फ्लेक्सीकॅप फंडात २२० पटींनी वाढ
मुंबई, ता. २६ ः पराग पारीख फायनान्शिअल ॲडव्हायझरी सर्व्हिसेसच्या फ्लेक्सीकॅप फंडाला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली. या काळात फंडाची मालमत्ता २२० पटींनी वाढली असून गुंतवणुकदारांना वार्षिक १८.१० टक्के दराने परतावा मिळाला.
ही योजना मे २०१३ मध्ये बाजारात आली तेव्हा तिच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता १५२ कोटी रुपये होती. आता ती ३३ हजार ६१५ कोटी रुपये झाली आहे. त्यावेळी या फंडातील गुंतवणूकदारांची संख्या ८०० होती, ती आता २८ लाख झाली आहे. या फंडातील गुंतवणूकदारांना स्थापनेपासून वार्षिक १८.१० टक्के चक्रवाढ दराने परतावा मिळाला आहे. प्रामाणिकपणा, पारदर्शकता व शिस्त या तत्त्वांवर आमची वाटचाल आधारित आहे, असे कंपनीचे अध्यक्ष व सीईओ नील पारीख म्हणाले.
या फंडामार्फत भारतातील आणि परदेशातील मोठ्या, मध्यम तसेच छोट्या आकाराच्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. तसेच बाजारातील उतार-चढावाचा आणि विशेष प्रसंगांचा फायदा घेण्यासाठीही गुंतवणूक केली जाते. याखेरीज फंडाकडे पराग पारीख लिक्विड फंड, पराग पारीख टॅक्स सेव्हर फंड आणि पराग पारीख कंझर्व्हेटीव्ह हायब्रीड फंड या अन्य योजनादेखील असल्याची माहिती चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर राजीव ठक्कर यांनी दिली.