महिंद्र आणि महिंद्रला दहा हजार कोटींचा नफा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिंद्र आणि महिंद्रला दहा हजार कोटींचा नफा
महिंद्र आणि महिंद्रला दहा हजार कोटींचा नफा

महिंद्र आणि महिंद्रला दहा हजार कोटींचा नफा

sakal_logo
By

मुंबई, ता. २६ : वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपनी महिंद्र आणि महिंद्रला नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात दहा हजार २८२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षापेक्षा हा नफा ५६ टक्के जास्त आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिश शहा, कार्यकारी संचालक राजेश जेजुरीकर यांनी आज येथे ही माहिती पत्रकारांना दिली. निव्वळ नफ्यात सर्वात जास्त वाटा म्हणजे ५,९८६ कोटी रुपये वाहन निर्मिती क्षेत्राचा आहे.

कंपनीला वर्षभरात एक लाख एकवीस हजार कोटी रुपयांचा एकत्रित महसूल मिळाला. जो गेल्या वर्षीपेक्षा ३४ टक्के जास्त आहे. यात वाहन निर्मिती क्षेत्राचा सर्वात जास्त आहे. त्यानंतर ट्रॅक्टर व इतर कृषी उपयोगी उपकरणे यांचा वाटा असल्याचेही सांगण्यात आले. कृषी उपयोगी उपकरणे क्षेत्रातील त्यांचा बाजार वाटा ४१ टक्के झाला आहे; तर महिंद्र लॉजिस्टिकने देखील पाच हजार कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. क्लब महिंद्राला देखील यावर्षी सतरा हजार नवे सदस्य मिळाले.

२५ ते २९ हॉर्स पॉवर क्षमतेचा स्वराज हा हलका ट्रॅक्टर दोन जून रोजी बाजारात येईल; तर महिंद्र ओजेए या ट्रॅक्टरचे जागतिक अनावरण १५ ऑगस्ट रोजी केले जाईल. थार ही पाच दारांची गाडी २०२४ या वर्षात बाजारात येईल, असेही आज सांगण्यात आले. भारताच्या आर्थिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या संधी साधण्यास कंपनी सज्ज आहे. त्याचबरोबर पर्यावरण जपण्यास उपयोगी होतील अशा बाबी करण्यातही आम्ही जागतिक नेतृत्व घेऊ, असेही सांगण्यात आले.