निर्देशांकांची मोठी घोडदौड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निर्देशांकांची मोठी घोडदौड
निर्देशांकांची मोठी घोडदौड

निर्देशांकांची मोठी घोडदौड

sakal_logo
By

मुंबई, ता. २६ ः परदेशी गुंतवणूकदारांची खरेदी आणि देशांतर्गत चांगल्या आर्थिक वातावरणाच्या जोरावर आज निर्देशांकातील बड्या शेअरची खरेदी झाली. त्यामुळे सेन्सेक्स व निफ्टी अनुक्रमे साडेबासष्ट हजारांवर आणि साडे अठरा हजारांवर मजल मारली. आज सेन्सेक्स ६२९.०७ अंश, तर निफ्टी १७८.२० अंशांनी वाढला.

सेन्सेक्स आज बासष्ठ हजारांवर गेल्यावर पुन्हा तो तेथून खाली आलाच नाही. दिवसअखेर सेन्सेक्स ६२,५०१.६९ अंशावर, तर निफ्टी १८,४९९.३५ अंशांवर स्थिरावला. आज सेन्सेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मा, एचसीएल टेक, हिंदुस्थान युनिलीव्हर, विप्रो या शेअरचे भाव दोन टक्का वाढले; तर टेक महिंद्र, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, टायटन, मारुती, आयसीआयसीआय बँक या शेअरचे भाव एक टक्का वाढले. दुसरीकडे एअरटेल, पॉवरग्रिड, एनटीपीसी या शेअरचे भाव किरकोळ घटले.
...........
निफ्टीने आज १८,४५० अंशांचा प्रतिरोध तोडला आहे. आता तो तेथे निर्णायकरीत्या टिकला तर काही आठवड्यांत तो पुन्हा सर्वकालिक उच्चांकावर जाईल.
- सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्विसेस