मुख्य न्यायमूर्तिपदी न्या. रमेश धनुका

मुख्य न्यायमूर्तिपदी न्या. रमेश धनुका

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २७ : मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तिपदावर न्या. रमेश धनुका यांची राष्ट्रपतींनी नियुक्ती केली आहे. उद्या (ता. २८) त्यांचा शपथविधी होणार आहे. दरम्यान, न्या. धनुका ३० मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे मुख्य न्यायमूर्ती पदावर चार दिवस काम करणारे ते न्यायमूर्ती असतील.

ऐतिहासिक वारसा असलेल्या मुंबई उच्च न्यायालयात मागील कित्येक महिने कायमस्वरूपी मुख्य न्यायमूर्ती नियुक्त नव्हते. केंद्र सरकारने शुक्रवारी (ता. २६) न्या. धनुका यांची नियुक्ती केल्याची अधिसूचना जारी केली. उच्च न्यायालयाचे ते ४६ वे मुख्य न्यायमूर्ती आहेत. रविवारी न्या. धनुका यांचा राजभवनात शपथग्रहण सोहळा होणार आहे. सोमवारपासून ते सुट्टीकालीन न्यायालयात याचिका सुनावणीचे काम सुरू करणार आहेत.

कायद्याचा गाढा अभ्यास, परखड निरीक्षण आणि संवेदनशील असा न्या. धनुका यांचा लौकिक आहे. जानेवारी २०१२ मध्ये त्यांची उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर नियुक्ती झाली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या कोलेजियम मंडळाने चालू वर्षी एप्रिलमध्ये त्यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारला केली होती. ३० मे रोजी ते निवृत्त होणार आहेत.

न्या. गंगापूरवाला मद्रास उच्च न्यायालयात
कोरोना कालावधीनंतर तत्कालीन मुख्य न्या. दीपांकर दत्ता यांना सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती मिळाली. त्यानंतर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून विद्यमान प्रभारी मुख्य न्या. एस. व्ही. गंगापूरवाला यांची नियुक्ती करण्यात आली. प्रभारी मुख्य न्या. गंगापूरवाला यांची आता मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्याची अधिसूचनाही केंद्र सरकारने काढली आहे. मार्च २०१० मध्ये ते उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर रुजू झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com