रेणुका शुगर्सला साडेआठ हजार कोटी महसूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेणुका शुगर्सला साडेआठ हजार कोटी महसूल
रेणुका शुगर्सला साडेआठ हजार कोटी महसूल

रेणुका शुगर्सला साडेआठ हजार कोटी महसूल

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ ः श्री रेणुका शुगर्सच्या नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षातील महसूल ४० टक्के वाढला आहे. या वर्षात त्यांना ८,६८६ कोटी रुपये महसूल मिळाला; तर त्यांचा करपूर्व नफाही वाढून तो १२२ कोटी रुपयांवर गेला.
त्यांचा मागील वर्षीचा महसूल सहा हजार दोनशे नऊ कोटी रुपये एवढा होता.
या वर्षातील त्यांच्या डिस्टिलरी उत्पादनात १९ टक्के वाढ झाली. या वर्षी त्यांनी १९.६ कोटी लिटर उत्पादन केले; तर त्यांची इथेनॉल उत्पादनाची रोजची क्षमताही आता ७२० किलोलीटर एवढी झाली आहे. त्यांची इथेनॉल निर्मितीची रोजची पूर्ण क्षमता १,२५० किलोलीटर असून या आर्थिक वर्षात पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू होईल. त्यांच्या इथेनॉलच्या विक्रीतही वीस टक्के वाढ झाली; तर शुद्ध साखरेच्या निर्यातीत १९ टक्के वाढ झाली आहे, असे मुख्य वित्त अधिकारी सुनील रांका यांनी सांगितले; तर या वर्षीचा गाळप हंगाम लवकर संपूनही देशांतर्गत साखर आणि इथेनॉलच्या विक्रीमुळे कंपनीची कामगिरी चांगली झाली, असे कार्यकारी अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी सांगितले.