Sat, Sept 23, 2023

तापमानात वाढ होण्याची शक्यता
तापमानात वाढ होण्याची शक्यता
Published on : 28 May 2023, 2:19 am
मुंबई, ता. २८ ः मुंबईत सध्या वातावरणाचा लपंडाव सुरू आहे. कधी पावसाच्या सरी बरसतात; तर कधी उष्मा वाढल्याचे दिसते. शनिवारी झालेल्या पावसाच्या सरींनंतरही आता कमाल तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईतील कमाल तापमान गेल्या काही दिवसांपासून ते साधारणतः ३३ अंशांवर स्थिर असल्याचे दिसते. आज कुलाबा ३४.४ आणि सांताक्रूझ ३४.४ अंश कमाल तापमान नोंदवण्यात आले. किमान तापमान अनुक्रमे २८.८ व २७.६ नोंदवण्यात आले. किमान तापानात काहीशी वाढ झाली असून पुढील ४८ तासांत कमाल तापमान ३५ अंशावर जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या पावसाबाबत कोणताही इशारा नसून आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज आहे.