Thur, October 5, 2023

अबन्स होल्डिंग्जला ७० कोटी नफा
अबन्स होल्डिंग्जला ७० कोटी नफा
Published on : 28 May 2023, 1:45 am
मुंबई, ता. २८ ः वित्तीय सेवा देणाऱ्या अबन्स होल्डिंग्ज लि. ला नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात ७० कोटी ३० लाख रुपये निव्वळ नफा झाला असून त्यात मागील वर्षापेक्षा १४ टक्के वाढ झाली आहे. या वर्षात कंपनीला १,१५० कोटी रुपये महसूल मिळाला. त्यात मागील वर्षीपेक्षा ८० टक्के वाढ झाली. त्यांचा मागील वर्षीचा महसूल ६३८ कोटी रुपये होता. कंपनीच्या एजन्सीचे उत्पन्न वार्षिक ८३ टक्क्यांनी वाढले आहे; तर त्यांचा निव्वळ एनपीए शून्यावर आला आहे. कंपनीने रेमिटन्स सेवांचा विस्तार केला असून अबन्स होल्डिंग्सची उपकंपनी असलेल्या कॉर्पोरेट एव्हेन्यू सर्व्हिसेसला इंग्लंडचा परवाना मिळाला आहे, असे कंपनी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक बन्सल म्हणाले.