यश बिर्लांना ब्रिटन, मिस्त्रला जाण्यास परवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यश बिर्लांना ब्रिटन, मिस्त्रला जाण्यास परवानगी
यश बिर्लांना ब्रिटन, मिस्त्रला जाण्यास परवानगी

यश बिर्लांना ब्रिटन, मिस्त्रला जाण्यास परवानगी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३० : मनिलॉण्डरिंगचा आरोप असलेले उद्योगपती यश बिर्ला यांना ब्रिटन आणि मिस्त्रला जाण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच दिली आहे. बिर्ला यांच्याविरोधात आर्थिक गुन्हेसंबंधित तपास सुरू आहे. येत्या जुलैपर्यंत त्यांना व्यवसायानिमित्त परदेशी जायचे आहे. याबाबत त्यांच्या वतीने ॲड. आबाद पोंडा यांनी उच्च न्यायालयात परवानगीसाठी याचिका केली होती.

न्या. अभय आहुजा आणि न्या मिलिंद साठ्ये यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. यापूर्वीही बिर्ला यांना न्यायालयाने परदेशी प्रवास करण्याची परवानगी दिली होती. त्या वेळी न्यायालयाने दिलेल्या सर्व शर्तींचे पालन त्यांनी केले होते, असे पोंडा यांनी खंडपीठाला सांगितले. न्यायालयाने याबाबत सहमती व्यक्त केली आणि याचिका मंजूर केली. तसेच त्यांच्या विरोधात दाखल केलेली लुक नोटीसदेखील न्यायालयाने १ जुलैपर्यंत निलंबित केली आहे. बिर्ला यांना एक जुलैपर्यंत भारतात परत यावे लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.