पावसाळ्यापुर्वी पुर्व उपलगरातील रस्ते चकाचक होणार, पावसाळ्यापुर्वी काम करणार,१६ कोटींचा खर्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाळ्यापुर्वी पुर्व उपलगरातील रस्ते चकाचक होणार, पावसाळ्यापुर्वी काम करणार,१६ कोटींचा खर्च
पावसाळ्यापुर्वी पुर्व उपलगरातील रस्ते चकाचक होणार, पावसाळ्यापुर्वी काम करणार,१६ कोटींचा खर्च

पावसाळ्यापुर्वी पुर्व उपलगरातील रस्ते चकाचक होणार, पावसाळ्यापुर्वी काम करणार,१६ कोटींचा खर्च

sakal_logo
By

पूर्व उपनगरांतील रस्ते लवकरच चकाचक
पावसाळ्यापूर्वी पालिका करणार १६ कोटींचा खर्च
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० ः पूर्व उपनगरातील परिमंडळ पाचमधील एल, एम-पूर्व आणि एम-पश्चिम विभागातील विविध रस्त्यांची पावसाळापूर्वीची सुरक्षात्मक देखभाल व तातडीची कामे केली जाणार आहेत. यासाठी रस्ते व वाहतूक खात्याचे प्रमुख अभियंता यांनी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. यावर १६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
महापालिकेच्या हद्दीतील लहान तथा मोठ्या रस्त्यांवर खड्डे भरण्याची कामे पावसाळ्यात दरवर्षी केली जातात. खड्ड्यांचे प्रमाण पावसाळ्यात कमी व्हावे म्हणून मान्सूनपूर्व सुरक्षात्मक उपाय म्हणून रस्त्यांच्या ठराविक ठिकाणांची पाहणी करून मान्सूनपूर्व तयारी म्हणून खड्डे बुजवण्याची कामे प्रशासनाने प्रस्ताविली आहेत. याकरिता संबंधित विभागातील रस्त्यांची सद्यस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून दुरवस्थेत असलेले, दोषदायित्व कालावधीमध्ये नसलेले व इतर आकस्मितपणे रस्त्यावरील पडलेले खड्डे बुजवण्याची कामे या प्रस्तावातून करण्यात येतील. विषयांकित प्रस्ताव महानगरपालिकेच्या पूर्व उपनगरातील परिमंडळ- ५ मधील एल, एम-पूर्व आणि एम-पश्चिम विभागाकरिता आहे. निर्देशित कामे पावसाळा पूर्वीचा व आवश्यकतेनुसार पावसाळादरम्यान पूर्ण करणे आवश्यक आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
पूर्व उपनगरातील परिमंडळ- ५ मधील सदर कामात रस्त्याची सुरक्षात्मक देखभाल, खड्डे बुजवणे तसेच आकस्मिक तातडीच्या स्वरूपाच्या कामाचा अंतर्भाव आहे. दुरुस्तीच्या कामासंबंधित ठेकेदाराने काम पूर्ण केल्यानंतर देयकांचे अधिदान केले जाणार आहे. सदर रस्त्यांवर पुढील दोष दायित्व कालावधीत काही खड्डे व इतर त्रुटी आढळल्यास संबंधित ठेकेदारांकडून विहित कालावधीमध्ये त्याची पूर्तता होण्यास विलंब होतो. त्यामुळे जनतेस होणाऱ्या अडीअडचणींमुळे महापालिकेस मोठ्या प्रमाणात टीकेस व लोकांच्या रोषास सामोरे जावे लागते. सदर बाब विचारात घेता रस्तेदुरुस्तीच्या कामात केलेले रस्ते हे दोषदायित्व कालावधीत चांगल्या स्थितीत राहावेत याकरिता काम पूर्ण झाल्यानंतर अनुज्ञेय देयकांच्या ८० टक्के रक्कम व उर्वरित २० टक्के रक्कम ही संबंधित रस्तेदुरुस्तीच्या कामाचा दोषदायित्व कालावधी सुरू झाल्यापासून तो पूर्ण होईपर्यंत दरवर्षी प्रमाणामध्ये देण्याची अट अंतर्भूत करण्यात आलेली आहे. यामुळे सदर रस्त्यांच्या दुरुस्ती कामामध्ये संबंधित ठेकेदार हे काम करताना दर्जा व गुणवत्ता राखेल, जेणेकरून रस्त्यांवर दोषदायित्व कालावधीमध्ये कोणत्याही त्रुटी निर्माण होणार नाहीत.
सदर काम तातडीचे असल्यामुळे व पावसाळ्यापूर्वी पूर्ण करता यावे या उद्देशामुळे राच दिवसांच्या लघुसूचनेद्वारे प्रशासकीय मान्यता घेऊन उपरोक्त काम पार पाडण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. त्याला मिळालेल्या प्रतिसादानुसार मे. इरिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्याचे ठरले असून यावर १६,००,०२,३३६ रुपये खर्च केले जाणार आहेत.
......................