Fri, Sept 22, 2023

‘बेस्ट बेकरी’ प्रकरणाचा निकाल उद्या
‘बेस्ट बेकरी’ प्रकरणाचा निकाल उद्या
Published on : 31 May 2023, 2:37 am
मुंबई, ता. ३१ : गुजरातमध्ये २१ वर्षांपूर्वी घडलेल्या बेस्ट बेकरी प्रकरणाचा निकाल विशेष न्यायालयात २ जूनला जाहीर होणार आहे. गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीत प्रक्षुब्ध जमावाने बेस्ट बेकरी जाळली होती. यामध्ये १४ मृत्युमुखी पडले होते. बेकरी मालकाची मुलगी झहिना शेख यांनी २१ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यामधील १९ जणांना दोषमुक्त करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने हा खटला मुंबईमध्ये वर्ग करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर हा खटला मुंबईत चालविण्यात आला. मुंबई न्यायालयाने नऊ आरोपींना दोषी जाहीर केले. या आरोपींमध्ये दोघांवर आता खटला सुरू आहे. आरोपी हर्षद सोलंकी आणि मफत गोहील मागील १० वर्षे कारागृहात आहेत. अजमेर बॉम्बस्फोट खटल्यातही ते आरोपी होते.