कोटक बँक व ‘मिंत्रा’चे संयुक्त क्रेडिट कार्ड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोटक बँक व ‘मिंत्रा’चे संयुक्त क्रेडिट कार्ड
कोटक बँक व ‘मिंत्रा’चे संयुक्त क्रेडिट कार्ड

कोटक बँक व ‘मिंत्रा’चे संयुक्त क्रेडिट कार्ड

sakal_logo
By

मुंबई, ता. १ ः कोटक महिंद्र बँक आणि ऑनलाईन फॅशन ब्रँड ‘मिंत्रा’ यांनी संयुक्त क्रेडिट कार्ड नुकतेच बाजारात आणले आहे. या कार्डावरून खर्च केल्यास ग्राहकांना काही सवलती मिळतील, तसेच बचतही करता येईल.

या कार्डवर व्यवहारही अत्यंत पटकन होतील. ‘मिंत्रा’ आणि कोटक बँकेच्या मोबाईल ॲपवरून हे कार्ड मागवता येईल. मास्टर कार्ड आणि रुपे नेटवर्कवरून या कार्डचे व्यवहार करता येतील. नव्या पिढीच्या ग्राहकांच्या फॅशनविषयक गरजा भागवण्यासाठी या कार्डाची रचना करण्यात आली आहे, असे कोटक बँकेचे फ्रेडरिक डिसूझा म्हणाले. या कार्डमुळे महानगरातील तसेच पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमधील ग्राहकांना सवलतींसह एक वेगळा शॉपिंगचा अनुभव मिळेल, असे मिंत्राचे उपाध्यक्ष संतोष केवलानी यांनी सांगितले.