गॅंगस्टर छोटा राजनला दिलासा नाही

गॅंगस्टर छोटा राजनला दिलासा नाही

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : नेटफ्लिक्सवरील स्कूप या वेबसिरीजच्या विरोधात गॅंगस्टर छोटा राजनने केलेल्या याचिकेवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने कोणताही दिलासा दिला नाही.

नेटफ्लिक्सच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्कूप मालिका शुक्रवारीच प्रदर्शित झाली. मालिका आधीच प्रदर्शित झाल्यामुळे त्यावर तूर्तास कोणताही दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला. याचिकेवर नियमित न्यायालयात पुढच्या आठवड्यात (ता.७) सुनावणी होईल, असे न्या. शिवकुमार डिगे यांनी स्पष्ट केले.

राजनने वेबसिरीजच्या प्रसारणाला मनाई करण्याची मागणी याचिकेवर केली आहे. पत्रकार ज्योर्तिमय डे यांच्या हत्येवर ही वेबसिरीज आधारित आहे आणि त्याच्या ट्रेलरमध्ये माझा फोटो दाखवला आहे, असा दावा राजनने याचिकेत केला आहे. पत्रकार जिग्ना व्होराचा यामध्ये उल्लेख आहे, असे देखील राजनने म्हटले आहे. राजनसह नऊ जण या खटल्यात सत्र न्यायालयात दोषी ठरले. याविरोधात त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. माझ्या छायाचित्रावर माझा अधिकार आहे. लोक त्याचा सहजपणे वापर करू शकत नाहीत, असा दावा राजनच्यावतीने करण्यात आला आहे. या छायाचित्राद्वारे त्याला दोषी ठरवण्यात येत आहे आणि याचा खटल्यावर परिणाम होऊ शकतो, असा युक्तिवाद राजनच्या वतीने करण्यात आला. दरम्यान, राजनच्या दाव्याचे खंडन प्रतिवादींकडून करण्यात आले. न्यायालयाने आठवडाभर सुनावणी तहकूब केली असून तपास यंत्रणेला खुलासा करण्याचे निर्देश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com