प्रदीप शर्माचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रदीप शर्माचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेश
प्रदीप शर्माचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेश

प्रदीप शर्माचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेश

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : प्रकृती अस्वास्थ्यामुळे मागील एक महिन्याहून अधिक काळ रुग्णालयात असल्याबद्दल विशेष न्यायालयाने एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माच्या तब्येतीचा अहवाल सादर करण्याचे आदेश ससून रुग्णालयाला दिले आहेत.

शर्मा एंटिलिया स्फोटक प्रकरणात आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात आरोपी आहे. सध्या त्याला येरवडा कारागृहात ठेवण्यात आले आहे. मात्र मागील ४४ दिवस तो ससून रुग्णालयात उपचार घेत आहे. याबाबत एनआयएने न्यायालयात अर्ज केला आहे. शर्मा त्याला मिळालेल्या वैद्यकीय सवलतीचा गैरवापर करत आहे व तो रुग्णालयात अनेकांना भेटतो आणि बोलतो, अशी तक्रार यामध्ये करण्यात आली आहे. न्यायालयाने याची दखल घेतली असून रुग्णालय व्यवस्थापनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच शर्माला कोण कोण भेटायला आले होते याची यादी देण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणामध्ये शर्मासह बडतर्फ पोलिस निरीक्षक सचिन वाझे प्रमुख आरोपी आहेत. सध्या दोघेही अटकेत आहेत.