रात्रशाळांचीही निकालात भरारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रात्रशाळांचीही निकालात भरारी
रात्रशाळांचीही निकालात भरारी

रात्रशाळांचीही निकालात भरारी

sakal_logo
By

मुंबई, ता. २ : दहावीच्या परीक्षेत राज्यातील रात्रशाळांनीही निकालात भरारी घेतली आहे. राज्यातील एकूण १८५ रात्रशाळांतील १४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून १३ शाळांचा निकाल ९० टक्क्यांहून अधिक लागला आहे. परीक्षेला यंदा सर्व रात्रशाळांमधून १ हजार ५६७ विद्यार्थी बसले होते, त्यातील १ हजार २४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यात २४७ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत गुण पटकावले आहेत.

मुंबईसह राज्यातील पुणे, नागपूर, नगर, सांगली, सातारा, सांगली, इचलकरंजी आणि अकलूज आदी ठिकाणी सुरू असलेल्या ९५ हून अधिक रात्रशाळांना ‘मासूम’ संस्थेच्या माध्यमातून तज्ज्ञ शिक्षक, अभ्यासक्रमासाठी आवश्यक साहित्य आदी पुरविले जाते. त्या शाळांचा निकालही ७९.५८ टक्के लागला असल्याची माहिती ‘मासूम’चे दहावी विभाग प्रमुख शशिकांत गवस यांनी दिली. मासूमच्या संस्थापक व कार्यकारी प्रमुख निकीता केतकर यांच्या पुढाकारामुळे राज्यातील रात्रशाळांना विविध प्रकारचे साहित्य, विषयतज्ज्ञ पुरविले जातात. यामुळे अनेक शाळांना बळ मिळत असल्याचे रात्र शाळातील मुख्याध्यापकांकडून सांगण्यात आले.