मुंबईतील रस्त्यांचे होणार डिजिटायजेशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील रस्त्यांचे होणार डिजिटायजेशन
मुंबईतील रस्त्यांचे होणार डिजिटायजेशन

मुंबईतील रस्त्यांचे होणार डिजिटायजेशन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मुंबईतील सर्व रस्त्यांचा पालिका डिजिटल सर्वे करणार आहे. त्यासाठी रोड डिजिटायजेशन आणि क्वॉलिटी कलेक्शन डेटा जमा केला जाणार आहे. रोड डिजिटायजेशन आणि क्वॉलिटी डेटाचे जतन करण्यासाठी एजन्सीची नियुक्ती केली जाणार असून त्यासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत. यासाठी पालिका २७,४४,८२,२५८ रूपये खर्च करणार आहे.
पालिकेच्या सर्व प्रमुख रस्त्यांच्या रोड डिजिटायजेशन आणि क्वालिटी डाटा कलेक्शन वहन करण्यासाठी एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. तीन वर्षांच्या कालावधीसाठी दोन वर्षांच्या वार्षिक देखभालीच्या समावेशासह रस्ते मूल्याकन-१ आणि इन्व्हेंट मॅनेजमेंटसाठी संपूर्ण स्वयंचलित सेवा आधारित आयटी प्लॅटफॉर्म आणि उपाय आणि अत्याधुनिक सर्व्हे तंत्रज्ञानासाठी रोड डिजिटायजेशन एजन्सीच्या नियुक्तीसाठीचा प्रस्ताव तयार केला आहे.
पालिकेने सर्व २४ वॉर्डांतील रस्त्यांचे डिजिटायजेशन हाती घेण्याचे प्रस्तावित केले आहे. यासाठी आयटी विभागाची मदत घेऊन तसे तंत्रज्ञान विकसित केले जाणार आहे. डिजिटायजेशनसाठी दररोज तपासणी करून अहवाल देणारी प्रो-अॅक्टिव्ह यंत्रणा असणे आवश्यक आहे. त्यासाठी पालिकेने एजन्सीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या एजन्सी प्रभाग स्तरावर काम करणार आहेत. या एजन्सींची नियुक्ती केल्याने, याप्रकरणी केलेल्या कारवाईचे मूल्यमापन न्यायलयही करणार आहे.

......................
मुंबईत २०५० किलोमीटर रस्त्यांचे जाळे
पालिकेचे मुंबईत कमी-अधिक २०५० किलोमीटर लांबीचे रस्त्यांचे जाळे आहे. त्याचे सर्वेक्षण केले जाणार असून यावर प्रतिमहिना कामाची एकूण किंमत ४२,१५,३९० इतकी आहे. २०२२-२३ वर्षासाठी ५,०५,८४,६८० रुपये अंदाजित खर्च केला जाणार आहे. प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्येक वॉर्ड स्तरावर योग्य बजेटची तरतूद केली जाईल आणि सर्व वॉर्डांना वॉर्डात मनुष्यबळ पुरवठ्यासाठी एजन्सीची नियुक्ती लागू करण्यासाठी ई-कोटेशन / निविदा आमंत्रित करण्याचे निर्देश दिले जाणार आहेत.