Thur, Sept 21, 2023

कौशल्य विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. राहुल दहातोंडे
कौशल्य विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. राहुल दहातोंडे
Published on : 3 June 2023, 3:05 am
मुंबई, ता. ३ : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे पहिले कुलसचिव म्हणून डॉ. राहुल दहातोंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज भवनने या नियुक्तीवर मोहोर लावत यासाठीचे आदेश जारी केले आहेत. या सोबतच विद्यापीठाच्या मूल्यांकन आणि मूल्यमापनच्या संचालपदी डॉ. राजेंद्र तलवारे आणि कौशल्य विकास विभागाचे प्रमुख म्हणून रवलनाथ लवंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कौशल्य विद्यापीठ कायदा २०२१ मधील तरतुदीनुसार ही नियुक्ती करण्यात आली असून त्यासाठीची मुदत दोन वर्षांची असेल.