ढगाळ वातावरण, हलक्या पावसाची शक्यता

ढगाळ वातावरण, हलक्या पावसाची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः रविवारी दिवसभर मुंबईत ढगाळ वातावरण होते. आभाळ ढगांनी आच्छादले असले तरी तापमानात वाढ नोंदवण्यात आली. हवामान खात्याने हलक्या पावसाचा इशारा दिला आहे.
दरम्यान, सोमवारीदेखील ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कुलाबा ३५.२ तर सांताक्रूझमध्ये ३४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानात अनुक्रमे एका अंशाची नोंद झाली. किमान तापमानातही वाढ झाली असून कुलाबा २८.८; तर सांताक्रूझ २९.५ अंशांची नोंद झाली. किमान तापमानात अनुक्रमे १ आणि २ अंशांची वाढ झाली आहे. मुंबईतील कमाल तापमान ३३ अंश नोंदवण्यात आले तरी आर्द्रता कायम असल्याचे दिसले. कुलाबा ७७; तर सांताक्रूझ ७३ टक्के आर्द्रता नोंदवण्यात आली. हवामान विभागाने सोमवारीदेखील अंशतः ढगाळ वातावरण राहणार अससल्याचा अंदाज वर्तवला आहे. शिवाय हलक्या किंवा रिमझिम पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com