शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या मुस्लिमांना आरक्षण द्या : नसीम खान

शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या मुस्लिमांना आरक्षण द्या : नसीम खान

मुंबई, ता. ४ : मुस्लिम समुदायाच्या विकासासाठी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांना आरक्षण पुन्हा बहाल करावे, अशी मागणी राज्य काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री नसीम खान यांनी केली आहे.

यंदाच्या यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तिघा विद्यार्थ्यांचा जमायते उलेमा ए हिंदतर्फे सत्कार करण्यात आला, त्या वेळी त्यांनी ही मागणी केली. सय्यद मोहम्मद हुसेन, आयेशा काझी, शबीना अन्सारी अशी या तिघांची नावे आहेत. हे तिघेही विद्यार्थी सामान्य परिस्थितीतूनच मेहनतीने व जिद्दीने या पदावर पोहोचले आहेत असेही ते म्हणाले. मुस्लिम समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाचा पुष्कळ उपयोग होईल. त्यायोगे ते स्पर्धात्मक युगासाठी सज्ज होतील. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना २०१४ पूर्वी आपल्या प्रयत्नांमुळे मुस्लिमांना आरक्षण मिळाले होते; मात्र नंतर सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना सरकारने मुस्लिमांना आरक्षण नाकारले. मुस्लिम हे आर्थिकदृष्ट्या मागास असल्याने आता एकनाथ शिंदे सरकारने निदान त्या निकषावर तरी त्यांना आरक्षण द्यावे, त्याचा मुस्लिमांना खूप फायदा होईल, असे आवाहनही खान यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com