आदर पूनावाला यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करू नका

आदर पूनावाला यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करू नका

मुंबई, ता. ५ : कोरोना प्रतिबंधक लस कोविशिल्ड आणि सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांच्याबाबत समाज माध्यमावर कोणताही आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करू नये. आतापर्यंत टाकण्यात आलेला मजकूर तातडीने हटवावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित नेटकऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे पूनावाला यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोना काळात सिरमने कोविशिल्ड प्रतिबंधक लस निर्माण केली होती. देशात करोडो नागरिकांनी ती घेतली आहे; मात्र कोविशिल्ड लस आरोग्यासाठी घातक आहे, असा दावा करणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर योहान टैंग्रा आणि अंबर कोरी यांनी पोस्ट केल्या आहेत. त्यांच्या पोस्टमुळे कंपनीची, आमची आणि देशाची प्रतिमा मलीन झाली असून बदनामी झाली आहे, असा आरोप करणारी याचिका पूनावाला यांनी केली आहे. न्या. रियाज छागला यांच्यापुढे फेब्रुवारीत याचिकेवर सुनावणी झाली होती. त्यावर आज न्यायालयाने निकाल जाहीर केला.

प्रथमदर्शनी समाजमाध्यमांवरील लिहिलेला मजकूर बदनामीकारक आहे असे दिसते. अशा पोस्ट करण्याचे पुरेसे स्पष्टीकरणही करण्यात आलेले नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. टैंग्रा आणि कोरी यांनी केलेल्या संबंधित पोस्ट समाजमाध्यमातून हटवाव्यात आणि नव्याने कोणतीही पोस्ट करू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे वेबसाईटसह समाजमाध्यमांतून सर्व पोस्ट हटवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

कोविशिल्डमुळे रुग्णांना मृत्यू आल्याचा दावा संबंधित समाजमाध्यमकारांनी केला होता. पूनावाला यांना त्यासाठी जबाबदार धरून टीकाही केली होती.

शंभर कोटींचा दावा
आदर पूनावाला यांनी केलेल्या मानहानीसंबंधित याचिकेत शंभर कोटी रुपयांचा दावा करण्यात आला आहे. भविष्यात दोघांना कोविशिल्डबाबत पोस्ट करण्यासाठी मनाई करण्याची मागणीही याचिकेत केली गेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com