गोराई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोराई
गोराई

गोराई

sakal_logo
By

गोराईतील अवैध बांधकामांच्या जागी
शिवरायांचे वॉर म्युझियम होणार
मुंबई, ता. ६ : गोराई परिसरातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवरील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले असून, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती आणि आरमार यांची माहिती देणारे संग्रहालय उभे करण्याची घोषणा त्यांनी आज केली. अनधिकृत बांधकामे पाडण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे.
लोढा यांनी मुंबई उपनगर परिसरात अनधिकृतपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार नुकतेच मालवणी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली होती. त्याचप्रमाणे सोमवारी गोराईतील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सरकारी जागेवरील अतिक्रमण हटवण्यात आले. तिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्धकौशल्य व आरमारासंदर्भात प्रेरणा आणि माहिती देणारे भव्य संग्रहालय उभारले जाणार असल्याची माहितीही लोढा यांनी दिली. संग्रहालयामुळे पुढील पिढ्यांना छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास अनुभवता येईल, असेही सांगण्यात आले.