लोकसभा निवडणुकीचा विधानसभेवर परिणाम?
लोकसभा निवडणुकीचा विधानसभेवर परिणाम?
मागील निवडणुकीत २० विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी; महायुती फक्त १६ जागांवर पुढे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० ः लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहा जागा आणि ३६ विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केली होती. सहा पैकी चार जागा महाविकास आघाडीने पटकावल्या, तर महायुतीला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.
एकूण ३६ विधानसभा मतदारसंघांपैकी २० विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीने, १६ विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीला आघाडी घेता आली. लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानावर लक्ष दिल्यास महाविकास आघाडीचे पारडे सध्या तरी जड दिसत आहे, तर महायुतीला प्रत्येक मतासाठी झगडावे लागण्याची शक्यता आहे.
दक्षिण मुंबई मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांना ५२ हजार ६७३ मतांची आघाडी मिळाली. अरविंद सावंत यांना तीन लाख ९५ हजार ६५५, शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांना तीन लाख ४२ हजार ९८२ मते मिळाली. येथे सहापैकी वरळी, शिवडी, भायखळा आणि मुंबादेवी या चार मतदारसंघात अरविंद सावंत यांना आघाडी मिळाली, तर यामिनी जाधव यांनी मलबार हिल आणि कुलाबा या केवळ दोन मतदारसंघातून आघाडी घेतली.
दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांना तीन लाख ९५ हजार १३८ मते मिळाली. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांचा पराभव केला. शेवाळे यांना तीन लाख ४१ हजार ७५४ मते मिळाली. अनिल देसाई यांना ५३ हजार ५१४ मतांची आघाडी मिळाली. त्यांना अणुशक्तीनगर, चेंबूर, धारावी आणि सायन कोळीवाडा येथून आघाडी मिळाली, तर वडाळा आणि माहीममधून राहुल शेवाळे यांनी आघाडी घेतली.
उत्तर मुंबई हा भाजपचा गड मानला जातो. लोकसभेला येथून पियूष गोयल हे तीन लाख ५३ हजार २५६ इतक्या भरघोस मतांनी जिंकून आले. गोयल यांना सहा लाख ७३ हजार ८२८ मते मिळाली. काँग्रेसचे भूषण पाटील पराभूत झाले. त्यांना तीन लाख २० हजार ५७२ मते मिळाली. उत्तर मुंबईतील सहा विधानसभा मतदारसंघातील मालाड पश्चिम मतदारसंघ सोडून बाकी सर्व मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी पिछाडीवर आहे.
लोकसभेला उत्तर पश्चिम मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तुल्यबळ लढत झाली. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांना चार लाख ५२ हजार ६४४ मते, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना चार लाख ५२ हजार ५९६ मते मिळाली. वायकर फक्त ४८ मतांनी विजयी झाले. गोरेगाव आणि अंधेरी पूर्वमधून शिवसेना ठाकरे गटाला किरकोळ आघाडी घेता आली.
उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संजय पाटील हे २९ हजार ८६१ मतांनी विजयी झाले. संजय पाटील यांना चार लाख ५० हजार ९३७, तर भाजपच्या मिहीर कोटेचा यांना चार लाख २१ हजार ७६ सते मिळाली. येथील सहापैकी चार मतदारसंघात संजय पाटील यांना आघाडी मिळाली, तर मिहीर कोटेचा यांना केवळ दोन मतदारसंघात आघाडी मिळवता आली.
उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना चार लाख ४५ हजार ५४५ मते, भाजपच्या उज्ज्वल निकम यांना चार लाख २९ हजार ३१ मते मिळाली. वर्षा गायकवाड यांनी १६ हजार ५१४ मतांनी विजय प्राप्त केला. येथील सहा मतदारसंघापैकी पाच मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना आघाडी मिळाली. यात चांदिवली, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम मतदारसंघाचा समावेश आहे, तर भाजपच्या उज्ज्वल निकम यांना केवळ विलेपार्ले या एकमेव मतदारसंघातून आघाडी घेता आली.
दक्षिण मुंबई
मतदारसंघ - महाविकास- महायुती - आघाडी
वरळी -६४,८४४- ५८,१२९ = ६,७१५ - महाविकास
शिवडी - ७६,०५३- ५९,१५० = १६,९०३ - महाविकास
भायखळा -८६,८८३- ४०,८१७ = ४६,०६६ - महाविकास
मलबार हिल -१९,५७३-८७,८०७ = ६८,२३४ - महायुती
मुंबादेवी -७७,४६९- ३६,६९० = ४०,७७९ - महाविकास
कुलाबा -४८,९१३- ५८,६४५ = ९,७३२ - महायुती
दक्षिण मध्य मुंबई
अणुशक्तीनगर -७९,७६७-५०,६८४ = २९,०८३ - महाविकास
चेंबूर-६१,३५५-५८,४७७ = २,८७८ - महाविकास
धारावी -७६,६७७-३९,८२०=३६,८५७ - महाविकास
शीव कोळीवाडा - ७०,९३१- ६१,६१९ =९,३१२ - महाविकास
वडाळा -४९,११४- ५९,७४० = १०,६२६ - महायुती
माहीम -५५,४९८- ६९,४८८ = १३,९९० - महायुती
उत्तर मुंबई
बोरिवली - १,४७,१००- ४६,३२५ = १,००,७७५ - महायुती
दहिसर - १,०८,४१९- ४६,१७२= ६२,२४७ - महायुती
मागाठाणे - १,०१,३२१- ५५,४१३= ४५,९०८ - महायुती
कांदिवली - १,०८,५३६- ३८,६३१= ६९,९०५ - महायुती
चारकोप - १,२५,६३५-४६,५३९ = ७९,०९६ - महायुती
मालाड पश्चिम ८७,४४०- ८८,३७५= ९३५ - महाविकास
...................
उत्तर पूर्व
मुलुंड -५५,९७९ - १,१६,४२१= ६०,४४२ - महायुती
विक्रोळी - ६८,६७२- ५२,८०७ = १५,८६५ - महाविकास
भांडुप प. - ७९,११७ - ७५,६५९ = ३,४५८ - महाविकास
घाटकोपर प. - ७९,१४२-६३,३७० = १५,७७२ - महाविकास
घाटकोपर पू.- ४९,६२२-८३,२३१ = ३३,६०९- महायुती
मानखुर्द शिवाजीनगर-१,१६,०७२-२८१०१ = ८७,९७१ - महाविकास
उत्तर पश्चिम
जोगेश्वरी पूर्व - ८३,४०९- ७२,११८ = ११,२९१ - महायुती
दिंडोशी - ७७,४७९-७५,७६८ = १७११ - महायुती
गोरेगाव - ७०,५६२- ९४,३०४ = २३,७४२ - महाविकास
वर्सोवा -८०,४८७- ५९,३९७ = २१,०९० - महायुती
अंधेरी प. - ७०,५२२- ७०,४४३ = ७९ - महायुती
अंधेरी पू. - ६८,६४६- ७८,४६४ = ९,८१८ - महाविकास
....................
उत्तर मध्य
विलेपार्ले - ४७,०१६ - ९८,३४१ = ५१,३२५ - महायुती
चांदिवली -१०,२९९ - ८,६६१ = ४,३२४ - महाविकास
कुर्ला -८२,११७-५८,५५३ = २३,५६४ - महाविकास
कलिना -६७,६२० -५१,३३८ = १६,२८२ - महाविकास
वांद्रे पू. - ७५,०१३ -४७,५५१ = २७,४६२ - महाविकास
वांद्रे प. -७९,३४७ -७२,९५३ = ६,३९४ - महाविकास
...................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

