

मुंबईत ॲडव्हान्टेज आसाम परिषद
मुख्यमंत्री सरमा यांचा रोड शो
मुंबई, ता. ७ : आसाम गुंतवणुकीचे एक प्रमुख ठिकाण म्हणून विकसित होत असून, तेथे व्यवसायासाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे, असे आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांनी सोमवारी येथे सांगितले.
गुवाहाटी येथे २५ व २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ॲडव्हान्टेज आसाम परिषदेसाठी आसाम इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने फिक्कीसह येथे सोमवारी (ता. ६) आयोजित केलेल्या रोड शोदरम्यान ते बोलत होते. या वेळी डॉ. सरमा आणि आसाममधील शिष्टमंडळाने टाटा समूह, महिंद्र समूह, अदाणी समूह, लार्सन अँड टुब्रो, डी-मार्ट, एस्सार समूह, वेलस्पन समूह आणि पिरामल समूह यासारख्या कंपन्यांच्या वरिष्ठ प्रतिनिधींशी संवाद साधला.
डॉ. हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, आसामला गुंतवणुकीचे एक प्रमुख ठिकाण म्हणून विकसित करण्यावर भर दिला जात आहे. गुवाहाटीहून उड्डाण केल्यानंतर तीन तासांच्या आत सुमारे चौदा देशांमधील तीस टक्के लोकसंख्येपर्यंत उद्योग पोहोचू शकतात. अशा प्रकारे आसामला व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी एक आदर्श केंद्र बनवणे, हा आमचा होतू आहे. आसामने रस्ते, रेल्वे आणि डिजिटल क्षेत्रांमध्ये पासष्ट हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह पायाभूत सुविधांचा जलद विकास केला आहे. आसामला उत्पादन केंद्र बनवण्याची आमची महत्त्वाकांक्षा आहे.
...
टाटा ट्रस्टसोबत चर्चा
डॉ. सरमा यांनी जागतिक दर्जाचे कर्करोग काळजी नेटवर्क स्थापन करण्यासाठी टाटा ट्रस्टसोबत चर्चा केली. आसाममध्ये उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्था तसेच १३ वैद्यकीय महाविद्यालये असून, १० महाविद्यालयांचे काम प्रगतिपथावर आहे, असे ते म्हणाले. राज्याने एक असामान्य गुंतवणूक धोरण तयार केले असून, सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांना समान वागणूक दिली जाईल. प्रत्येक उद्योगाच्या वेगवेगळ्या गरजा असतात आणि आम्ही त्या पूर्ण करतो. दर्जेदार मनुष्यबळ निर्माण होण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.