चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला पेटवले

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला पेटवले
Published on

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला पेटवले

मुंबई : चारित्र्याच्या संशयावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीला जाळले. चेंबूरच्या वाशीनाका परिसरात घडलेल्या या घटनेत महिला सुमारे ३३ टक्के भाजली असून, तिच्यावर शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी आरोपी पतीविरोधात हत्येचा प्रयत्न या कलमानुसार गुन्हा नोंदवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव दिनेश आव्हाड (वय ४६) असे आहे. तो पत्नी रेखासोबत (३४) वाशीनाका परिसरात राहत होता. दिनेशला रेखाच्या चारित्र्यावर संशय होता. त्यातूनच घटना घडण्यापूर्वी दिनेशने रेखाकडे शरीरसंबंधांची मागणी केली. रेखाने त्यास नकार देताच दिनेशने वाद घातला. वाद विकोपाला जाताच रेखाने रागाच्या भरात अंगावर रॉकेल ओतून घेतले आणि पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी तिच्या हातून माचीसची काडी पेटत नव्हती, तेव्हा दिनेशने स्टोव्हवर कागद पेटवून रेखावर भिरकावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com