आता टपाल विभागात ‘कॅश ऑन डिलिव्हरी’
आता टपाल विभागात
‘कॅश ऑन डिलिव्हरी’
‘आयटी मॉडर्नायझेशन २.०’ मंगळवारपासून सुरू होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ ः भारतीय टपाल विभागाचे ‘आयटी मॉडर्नायझेशन २.०’ला मंगळवार (ता. २२)पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता टपाल विभागात कॅश ऑन डिलिव्हरी सेवा मिळू शकणार आहे. यामुळे ग्राहकांना पीकअपची सुविधाही मिळणार आहे, अशी माहिती टपाल विभागाने दिली.
टपालच्या सर्व सेवा ‘सॅप’ प्रणालीमार्फत देण्यात येत होत्या. ही प्रणाली एका खासगी कंपनीची होती. आता टपाल खात्याने ‘दर्पण २.०’ हे ॲप तयार केले आहे. आयटी मॉडर्नायझेशन २.० अंतर्गत म्हैसूर येथे हे ॲप तयार करण्यात आले असून टपाल खात्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे काम सोपे आणि जलद होणार आहे. तसेच, ग्राहकांना क्यूआर कोड स्कॅन करून यूपीआयद्वारे पेमेंट करता येणार आहे. यासोबत अन्य नवीन सुविधाही ॲपमध्ये असणार आहेत. यामध्ये जीपीएसच्या माध्यमातून पोस्टमनला पार्सल पोहोचवणे सोपे होणार आहे. ही ओटीपी आधारित डिलिव्हरी सिस्टीम असणार आहे. डाक सेवा ॲपवरच व्यापारी, ग्राहक यांना उपलब्ध होईल. ग्राहकांना कमी दरात पीकअप सेवा असणार आहे.
===
‘आयटी २.०’ प्रणालीचे फायदे
- दैनंदिन कामे जलद व सोप्या पद्धतीने करता येणार
- विविध विभागांची माहिती एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध
- प्रत्येक कृतीचे रेकॉर्ड राहणार
- कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होणार
- पार्सलचा ठावठिकाणा जाणून घेता येणार
===
सोमवारी सर्व टपाल कार्यालये बंद
आयटी मॉडर्नायझेशन २.० मंगळवारपासून सुरू होणार आहे. त्यामुळे सोमवारी डेटा ट्रान्सफरच्या कामासाठी सर्व टपाल कार्यालये बंद असणार आहेत.
==
देशभरात ‘आयटी मॉडर्नायझेशन २.०’ प्रणालीवर काम करण्यात येणार आहे. पिकअपसाठी घरी पोस्टमन येणार आहे. पार्सलसाठी कॅश ऑन डिलिव्हरीची सेवा देता येणार आहे. ग्राहकांना पार्सलमध्ये काही वस्तू परत करायच्या असतील तर त्या परत करू शकतील. ग्राहकांनी या सेवांचा लाभ घ्यावा.
- अमिताभ सिंह, मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.