मुंबईकरांना हवा खासगी बससेवेचा पर्याय

मुंबईकरांना हवा खासगी बससेवेचा पर्याय

Published on

मुंबईकरांना हवा खासगी बससेवेचा पर्याय
वाहतूक कोंडी, सार्वजनिक वाहतुकीतील अडचणींवर तोडगा
नितीन जगताप  ः सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. २० ः  मुंबईतील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडत आहे. १९१४ मध्ये  १० लाख लोकसंख्या असताना बेस्टच्या ताफ्यात ४४०० बसगाड्या होत्या. आता १.३० कोटी लोकसंख्या असताना हा आकडा ३५०० वर आला आहे. मुंबईकरांसह प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता, नियमांचे पालन करून  खासगी बस वाहतुकीचा पर्याय उपलब्ध  करायला हवा, असे मत वाहतूकतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मुंबईत लोकसंख्येच्या तुलनेत बसची संख्या कमी आहे. बेस्टकडे केवळ २७०० बस असून, काही कंत्राटी बस आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टच्या मालकीच्या बसगाड्या वाढायला हव्यात; पण त्यासोबतच खासगी बससेवाही सुरू व्हायला हवी. कारपेक्षा बसची वाहतूक फायदेशीर आहे. बसच्या माध्यमातून दिवसभरात एक हजार प्रवाशांची वाहतूक होते, तर कारमधून दिवसभरात जास्तीत जास्त चौघेच प्रवास करतात. याशिवाय टॅक्सीतूनही दिवसभरात ३० ते ४० लोक प्रवास करतात. कारच्या तुलनेत तिप्पट जागा व्यापत असली, तरी १२ ते १३ पट प्रवासी बसने प्रवास करतात. त्यामुळे रस्ते वाहतुकीत सुधारणेसाठी बसचा जास्तीत जास्त वापर वाढला पाहिजे, असे वाहतूकतज्ज्ञ अशोक दातार यांनी सांगितले.
===
मुंबईतील बस वाहतुकीबाबत...
१९१४ मधील १० लाख लोकसंख्येसाठी बससंख्या - ४,४००
२०२५ मधील १.३० कोटी लोकसंख्येसाठी आवश्यक बससंख्या - १२,०००
बेस्टच्या ताफ्यातील बस - ३,५००
खासगी बस - ९३० 
उबर बस - ५०० (सध्या बंद)
सिटी फ्लो - ४००
मायलो  - ३०
----
 मुंबईत बसच्या माध्यमातून अधिकाधिक प्रवाशांनी प्रवास केल्यास रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल. चांगल्या दर्जाची वाहतूक सेवा मिळाल्यास लोकही खासगी वाहनांऐवजी बसला प्राधान्य देतील. 
- डॉ. शंकर विश्वनाथ, वाहतूकतज्ज्ञ
----
मुंबईत १८ हजार खासगी बस आहेत. त्यापैकी मुंबईतील वाहतुकीसाठी ८५० बस चालविण्यात येतात. त्यात उबरच्या ५०० बस बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते.
- हर्ष कोटक, सचिव, मुंबई बस मालक संघटना
===
मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कमी आहे. ज्या खासगी बस आहेत, त्या प्रीमियम सेवा देत आहेत. त्यामुळे बेस्टला त्याचा फटका बसणार नाही. त्यांना परवानगी देण्यास हरकत नाही.
- ए. व्ही. शेनॉय, वाहतूकतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com