अकरावीच्या दुसऱ्या फेरीसाठी आज अखेरची मुदत

अकरावीच्या दुसऱ्या फेरीसाठी आज अखेरची मुदत

Published on

अकरावीच्या दुसऱ्या फेरीसाठी आज अखेरची मुदत
आतापर्यंत एक लाख ७० हजार ४५८ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण
मुंबई, ता. २० : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत उद्यापर्यंत (ता. २१) असून, आतापर्यंत एक लाख ७० हजार ४५८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. यामध्ये कॅप प्रवेशातील एक लाख ३८ हजार २७९, तर कोट्यातील ३२ हजार ७९ प्रवेशांचा समावेश आहे.
दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी १७ जुलै रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यात राज्यभरातील नऊ हजार ४८३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या २१ लाख ३७ हजार ५५० जागांपैकी दोन लाख ५१ हजार ८०४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. त्यांना २१ जुलैपर्यंत प्रवेश घेण्याची मुदत देण्यात आली आहे. यात अद्याप ८१ हजार ३४६ जागांवर प्रवेश होणे बाकी आहेत. त्यानंतर शिक्षण विभागाकडून २२ ते २३ जुलैदरम्यान तिसऱ्या नियमित फेरीसाठी नव्याने अर्ज भरता येतील.
------
दुसऱ्या फेरीतील प्रवेश
विभाग कॅप प्रवेश कोटा प्रवेश एकूण प्रवेश
अमरावती ११,८८२ ३,४६४ १५,३६४
छ. संभाजीनगर १७,४९१ ३,८५३ २१,३४४
कोल्हापूर ११,१२१ २,९२७ १४,०४८
लातूर ८,७३७ २,२६३ ११,०००
मुंबई ३४,६४९ ९,४४६ ४४,०९५
नागपूर १६,३४२ २,३३० १८,६७२
नाशिक १४,९६९ २,७०८ १७,६७७
पुणे २३,०८८ ५,१८८ २८,२७६
----------------------------------------------------
एकूण १,३८,२७९ ३२,१७९ १,७०,४५८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com