अकरावीच्या दुसऱ्या फेरीचे प्रवेश पूर्ण

अकरावीच्या दुसऱ्या फेरीचे प्रवेश पूर्ण

Published on

अकरावीच्या दुसऱ्या फेरीचे प्रवेश पूर्ण
आता तिसऱ्या फेरीसाठीची तयारी
मुंबई, ता. २२ : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या कॅप आणि कोट्यातील प्रवेशाच्या फेरीची प्रवेश प्रक्रिया आज पूर्ण झाली. या फेरीत कॅप आणि कोट्यातील मिळून असे दोन लाख १५ हजार १५७ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश पूर्ण केले आहेत. यात कॅपमधील एक लाख ७४ हजार ३०८ आणि कोटा प्रवेशातील ४० हजार ८४९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
राज्यभरातील नऊ हजार ४३५ शाळामध्ये २१ लाख २३ हजार ४० इतकी प्रवेश क्षमता असून, यात यातील कॅप फेरीसाठी १८ लाख ९७ हजार ५२६ प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. यामध्ये पहिल्या फेरीदरम्यान १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांपैकी अर्ध्याच म्हणजे केवळ सहा लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालये अलॉट झाली होती. त्यातील चार लाख ३२ हजार २८७ जणांनी प्रवेश घेतले असून, दुसऱ्या फेरीत दोन लाख १५ हजार १५७ असे पहिल्या आणि दुसऱ्या नियमित फेरींमध्ये एकूण सात लाख २० हजार ६६६ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असल्याची माहिती शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.
दरम्यान, मुंबई विभागातील ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये एकूण चार लाख ६२ हजार २८० प्रवेशाच्या जागा आहेत. यात केवळ मुंबईत एक लाख ९८ हजार १७० जागा उपलब्ध आहेत. मुंबई विभागात दुसऱ्या कॅप फेरीसाठी ४४ हजार १३९ आणि कोटा प्रवेशातील ११ हजार ८२६ असे एकूण ५५ हजार ९६५ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत.


असे झाले दुसऱ्या फेरीतील प्रवेश
विभाग कॅप प्रवेश कोटा प्रवेश एकूण
अमरावती १५,७०० ४,४१७ २०,११७
छ. संभाजी नगर २३,०५३ ४,९०४ २७,९५७
कोल्हापूर १३,६४९ ३,६६६ १७,३१५
लातूर १०,८५१ २,८८७ १३,७३८
मुंबई ४४,१३९ ११,८२६ ५५,९६५
नागपूर १८,६८२ २,८३६ २१,५१८
नाशिक १८,४३० ३,६९६ २२,१२६
पुणे २९,८०४ ६,६१७ ३६,४२१
एकूण १,७४,३०८ ४०,८४९ २,१५,१५७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com