आयएनएस सतलजचा सागरी सर्व्हे यशस्वी
आयएनएस सतलजचा सागरी सर्व्हे यशस्वी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : भारतीय नौदलाचे सर्वेक्षण जहाज आयएनएस सतलजने मॉरिशस हायड्रोग्राफिक सेवेच्या सहकार्याने सुमारे ३५ हजार चौरस नॉटिकल मैल क्षेत्राचा सागरी सर्व्हे यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. हा सर्व्हे भारत आणि मॉरिशस यांच्यातील विद्यमान सामंजस्य करारानुसार दोन्ही देशांच्या विविध राष्ट्रीय संस्थांच्या समन्वयाने पार पडला.
या उपक्रमामुळे सागरी नकाशे तयार करणे, किनारी नियमन, सागरी संसाधनांचे व्यवस्थापन आणि पर्यावरणीय नियोजन या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण सुधारणा होणार आहेत. तसेच मॉरिशसच्या ‘ब्लू इकॉनॉमी’ अर्थात समुद्राधारित शाश्वत अर्थव्यवस्थेला या सर्व्हेमुळे मोठा हातभार लागणार आहे. उपक्रमाचा एक भाग म्हणून, मॉरिशसच्या विविध मंत्रालयांतील सहा अधिकाऱ्यांनी आयएनएस सतलजवर प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले. त्यांना आधुनिक हायड्रोग्राफिक तंत्रज्ञान आणि उपकरणांच्या वापराबाबत प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. याशिवाय आयएनएस सतलजने मॉरिशस नॅशनल कोस्ट गार्डसोबत संयुक्त आर्थिक क्षेत्रात गस्त आणि दहशतवादविरोधी मोहिमा राबवल्या. यामुळे प्रादेशिक सागरी सुरक्षेला अधिक बळकटी मिळाली आहे. सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर तयार झालेला फेअरशीट मॉरिशस सरकारकडे औपचारिकरीत्या सुपूर्द करण्यात आला. समारंभास मॉरिशसचे गृहनिर्माण व भूमी मंत्री शकील अहमद युसुफ अब्दुल रझाक मोहम्मद आणि भारताचे उच्चायुक्त अनुराग श्रीवास्तव उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

