बेस्टची धाव खासगीकरणाकडे!
बेस्टची धाव खासगीकरणाकडे!
स्वमालकीच्या उरल्या ११.६३ टक्केच बस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक्रमाच्या बस ताफ्यात सध्या केवळ ११.६३ टक्केच बस स्वतःच्या मालकीच्या आहेत, तर उर्वरित ८८.३७ टक्के बस खासगी कंपन्यांद्वारे चालवल्या जात आहेत.
सध्याच्या आकडेवारीनुसार, बेस्टकडे एकूण २,६४८ बस आहेत. त्यापैकी ३०८ बस बेस्टच्या ताब्यात असून, २,३४० बस खासगी कंपन्यांकडून चालवल्या जात आहेत. विना वातानुकूलित ९०३ बस असून, त्यापैकी २८३ बेस्टच्या आणि ६२० खासगी आहेत, तर वातानुकूलित बस एकूण १,७४५ असून, त्यापैकी फक्त २५ बेस्टच्या ताब्यात आहेत.
बेस्टमध्ये २०१९ पासून खासगीकरणाचा कल वाढला असून, बेस्टचा थेट ताबा कमी होत आहे. प्रवासी संघटनांनी या वाढत्या खासगीकरणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सार्वजनिक वाहतूक बेस्टच्या नावाखाली असली तरी संचालन आणि उत्पन्नाचा मोठा हिस्सा खासगी हातात गेल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते.
या कंपन्यांच्या बस
सध्या बेस्टसाठी बस चालवणाऱ्या प्रमुख खासगी ऑपरेटरमध्ये ईव्ही ट्रान्स मुंबई प्रायव्हेट लिमिटेड (६६२ बस), मातेेश्वरी लॉजिस्टिक्स (६००), श्री मारुती ट्रॅव्हल्स (६२५) आणि टाटा मोटर्स (३४०) या कंपन्यांचा समावेश आहे. ईव्ही (इलेक्ट्रिक) बस क्षेत्रात ईव्ही ट्रान्स मुंबई ही सर्वात मोठी कंपनी असून, तिने ६६२ बस मुंबईत पुरवल्या आहेत. याशिवाय स्विच मोबिलिटी, ओलेक्ट्रा ग्रीनटेक, पॅरस मोटर्स आणि ईव्ही ट्रान्स महाराष्ट्र प्रा. लि. यांच्याही बस बेस्टच्या ताफ्यात आहेत.
बेस्टमधील वाढते खासगीकरण हे बेस्टच्या अस्तित्वासाठी धोकादायक आहे. त्यात बेस्टच्या स्वतःच्या गाड्यांची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. याबाबत केवळ बेस्ट प्रशासनावर जबाबदारी ढकलून चालणार नाही, तर महापालिका आणि राज्य सरकारनेदेखील यात लक्ष घालायला हवे.
- सुहास नलावडे,
माजी सहाय्यक महाव्यवस्थापक, बेस्ट
बेस्ट ताफ्याचे तपशील :
प्रकार/ बीईएसटीच्या मालकीच्या / खासगी /एकूण बस
नॉन एसी - २८३ / ६२० / ९०३
एसी - २५ / १७२० / १७४५
एकूण - ३०८ / २३४० / २६४८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

