मुंबई विभागात लालपरीची ‘दिवाळी’

मुंबई विभागात लालपरीची ‘दिवाळी’

Published on

मुंबई विभागात लालपरीची ‘दिवाळी’
सणाच्या सात दिवसांत कमावले पाच कोटी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : दिवाळी सण आणि सलग सुट्ट्यांमध्ये पर्यटनाला आणि गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने मुंबई विभागातील आगारातून दररोज जादा गाड्यांचे नियोजन केले होते. त्याला प्रवाशांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून, सणाच्या २१ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत एसटीच्या मुंबई विभागाला चार कोटी ९९ लाखांचा महसूल मिळाला आहे.
दिवाळीच्या सुट्टीत प्रवासी महाराष्ट्रातील अनेक पर्यटनस्थळांना भेट देतात, तर अनेक जण आपापल्या गावी जातात. खासगी वाहतुकीच्या तुलनेत स्वस्त दर आणि सुरक्षित प्रवास म्हणून प्रवासी दरवर्षी एसटीतून प्रवासाला प्राधान्य देतात. मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे प्रवाशांनी पर्यटनाकडे पाठ फिरवली होती. यंदा मात्र महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी नियमित गाड्यांव्यतिरिक्त मुंबई विभागातून दररोज जादा गाड्या सोडण्यात आल्या.

आकडेवारी
कालावधी - २१ ते २७ ऑक्टोबर २०२५
चालवण्यात आलेल्या गाड्या - २४१
एकूण प्रवासीसंख्या - २,८६,०००
उत्पन्न - चार कोटी ९९ लाख ८९ हजार

एसटीला पसंती का?
एसटीने प्रवास केल्यास अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, महिलांना ५० टक्के तिकीटदरात सवलत मिळते. तसेच कमी दरात सुरक्षित प्रवास एसटीने करता येतो. खाजगी वाहतूकदारांनी केलेली लूट टाळली जाते. त्यामुळे प्रवाशांची एसटीला पसंती मिळाली.

पसंतीचे मार्ग
दादर - पुणे
मुंबई सेंट्रल - कराड
मुंबई सेंट्रल - कोल्हापूर
परळ - नारायणगाव
कुर्ला - घोडेगाव
मुंबई - सातारा
पनवेल - तारकपूर

मुंबईकरांनी दिवाळी सणानिमित्त लालपरीला खूप चांगला प्रतिसाद दिला. आपल्या घरी सण असूनदेखील कर्तव्य बजावत विक्रमी उत्पन्न आणणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन.
- अभिजित पाटील,
विभाग नियंत्रक, मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com