मुंबई सेंट्रल एसटी स्थानक राज्यात अव्वल

मुंबई सेंट्रल एसटी स्थानक राज्यात अव्वल

Published on

मुंबई सेंट्रल एसटी स्थानक राज्यात अव्वल
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ उपक्रमात मानाचा तुरा


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ ः एसटी महामंडळातर्फे राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ या उपक्रमात मुंबई विभागाने पुन्हा एकदा स्वच्छतेचा मानाचा तुरा पटकावला आहे. दुसऱ्या सर्वेक्षणाच्या निकालानुसार मुंबई विभागातील मुंबई सेंट्रल, दादर, कुर्ला नेहरूनगर आणि परळ या बसस्थानकांनी प्रादेशिक पातळीवरचे स्थान मिळवले आहे.

मुंबई प्रदेशातील ‘अ’ गटात मुंबई सेंट्रल बसस्थानकाने तब्बल ९२ गुण मिळवत पहिला क्रमांक, दादर-शिवनेरी बसस्थानकाने ८८ गुणांसह दुसरा क्रमांक, तर कुर्ला नेहरूनगरने ८५ गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला आहे. तर ‘क’ गटात परळ बसस्थानकाने पहिला क्रमांक पटकावला आहे. हे अभियान २३ जानेवारी २०२५ रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात आले असून राज्यातील तब्बल ५६८ बसस्थानकांवर हा उपक्रम सुरू आहे. वर्षभर चालणाऱ्या या मोहिमेत दर तीन महिन्यांनी स्वच्छतेचे मूल्यमापन केले जाते. ‘लोकसहभागातून बसस्थानकांचा विकास’ या मध्यवर्ती संकल्पनेखाली राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संघटना, युवक मंडळे आणि दानशूर व्यक्तींच्या सहभागातून प्रत्येक बसस्थानक अधिक स्वच्छ, आकर्षक आणि प्रवासीअनुकूल करण्यावर भर देण्यात आला आहे.
मुंबई सेंट्रल बसस्थानकाचा विकास जिल्हा नियोजन व विकास प्राधिकरणाच्या निधीतून करण्यात आला असून, बसस्थानकाचे रंगरंगोटी, सुशोभीकरण, वातानुकूलित चालक-वाहक विश्रांतिगृह आणि भारत पेट्रोलियमच्या सीएसआर निधीतून नूतनीकरण केलेले प्रसाधनगृह ही त्याची वैशिष्ट्ये ठरली आहेत.


..
मोफत खुला वाचन कट्टा
मुंबई सेंट्रल बसस्थानकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तरीनिमित्त मोफत खुला वाचन कट्टा सुरू होणार असून, प्रवाशांना वाचनाचा मनमोकळा अनुभव देणारे हे महाराष्ट्रातील पहिले एसटी वाचनालय ठरणार आहे. दरम्यान, ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ या उपक्रमाचे अजून दोन सर्वेक्षणे बाकी असतानाच मुंबई विभागाने आघाडी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com