माेर्चा काेट आणि चाैकटी

माेर्चा काेट आणि चाैकटी

Published on

अनेक वर्षांपूर्वी मृत झालेल्यांची नावे आणि फोटो यादीत मतदार म्हणून आहेत. हयात असलेल्या अनेकांची नावे यादीत दोन ते तीन वेळा नमूद आहेत. त्यामुळे या यादीनुसार यंत्राद्वारे होणाऱ्या मतदानावर आम्हाला अजिबात विश्वास नाही. त्याऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या किंवा मतदार यादीतला घोळ निस्तरा आणि मगच निवडणूक घ्या, ही माझी मागणी आहे.
- रमाकांत नवरत (वय ७०), परळ-भोईवाडा
----
‘वोट चोर... गादी सोड’ या मागणीसाठी आम्ही दादरवरून येथे मोर्चात सहभागी हाेण्यासाठी आलो आहोत.
- तारामती पोळ, जयंती बागले, दादर
---
मोर्चात परदेशी पाहुणा
ब्रिटनहून पर्यटनासाठी भारत सफरीवर आलेला ॲडम जेम्स हा परदेशी नागरिक मोर्चात सहभागी झाला. मनसेची टोपी आणि शेला घालून मोर्चात फिरणारा ॲडम सर्वपक्षीय आंदोलकांचे लक्ष वेधून घेत होता. टोपी आणि हा शेला कुणीतरी भेट दिला, असे ॲडमने सांगितले. मुंबईत भटकताना या आंदोलनाची माहिती मिळाली. सरकारच्या विरोधातील आंदोलन कसे केले जाते, हे पाहण्याची संधी मी घेतली, असेही ते म्हणाला.
-----
सजवलेल्या दुचाकीवरून...
पुण्याच्या हवेली तालुक्यातील केसनंद गावातून दिवंगत बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या तसबिरी लावून सजवलेल्या दुचाकीवरून मोहन यादव, त्यांचे चिरंजीव उद्धव या मोर्चात सहभागी झाले हाेते. यादव तीन दशके शिवसेनेचे (ठाकरे गट) काम करीत आहेत. त्यांनी आपल्या मुलांची नावेही उद्धव, राज अशी ठेवली आहेत. मी दिवंगत बाळासाहेब, उद्धव, राज ठाकरे आणि आमच्या पक्षाच्या प्रचारासाठी येथे आलो आहे. मतदार यादीत घोळ आहे आणि तो काढून यादी स्वच्छ करावी, या मागणीसाठी मी मोर्चात सहभागी झालो आहे, असे यादव यांनी सांगितले.
----------------------

वोट चोर, गद्दी छोड!
शिवसेना, मनसे असो की राष्ट्रवादी, माकप सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी मोर्चादरम्यान ‘वोट चोर, गद्दी छोड’चा नारा देत आंदोलनस्थळ अर्थात फॅशन स्ट्रीट ते महापालिका मुख्यालयाचे आवार दुमदुमून गेले हाेते.
----
सर्वत्र शिवसेना, मनसेचे झेंडे!
झटपट आटोपलेल्या या मोर्चात मुंबई महानगर प्रदेशासह अन्य जिल्ह्यांतून सर्वपक्षीय आंदोलक सहभागी झाले होते. त्यात शिवसेना (ठाकरे) आणि मनसे या पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. सर्वत्र या पक्षांचेच झेंडे दिसत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com