कुर्ल्यातील एका 
हॉटेलला आग

कुर्ल्यातील एका हॉटेलला आग

Published on

कुर्ल्यातील एका हॉटेलला आग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : कुर्ला (पश्चिम) येथील एलबीएस रोडवरील शीतल तलावाजवळच्या सनलाईट हॉटेलच्या तळघरात बुधवारी दुपारी अचानक आग लागली. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेबाबत कळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ही आग लेव्हल-१ची असल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर अवघ्या काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान, या घटनेत तळघरातील साहित्य जळाले असून, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सांगण्यात आले.

Marathi News Esakal
www.esakal.com